Ticker

6/recent/ticker-posts

बोरगाव च्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही -खा. श्रीनिवास पाटील

 शेंद्रे : गावाच्या विकासासाठी बोरगाव कारांची एकी कौतुकास्पद आहे.लोकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेऊन विकासकामांची मागणी करावी आम्ही ती पूर्ण करू.आदरणीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले व मी बोरगावच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.ते बोरगाव ता.सातारा येथे विविध विकासकामांच्या उदघाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना आ.शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडून बोरगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवल्या  बद्दल  समाधान व्यक्त केले. तसेच बोरगाव परिसरातील उर्वरित विकासकामे आमदार फंडातून पूर्ण करण्याचे अभिवचन दिले. 

 या वेळी   जलजीवन  मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना विहीर फिल्टरेशन प्लांट सहित ही १कोटी ६३ लाख रु.ची योजनेचे ,बोरगाव स्टँड ते बौद्ध वस्ती डांबरीकरण ,तसेच गावठाणअंतर्गत रस्ता डांबरीकरण,अंगणवाडी नूतन इमारत उद्घाटन, इत्यादी विकासकामांचे उदघाटन करण्यात आले.तसेच गावातील विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या माहिती तंत्रज्ञान सेल अध्यक्ष सारंगबाबा पाटील, मोहनराव साळुंखे,संजयबापू साळुंखे,पोलीस निरीक्षक संजय साळुंखे ,सौ.क्षीतीजा साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन देशमुख तर सूत्रसंचालन अजित निकम यांनी केले.अनिल वाघ यांनी आभार मानले या कार्यक्रमाला बाजार समिती चेअरमन विक्रम पवार,सयाजी चव्हाण,अजित साळुंखे ,तंटामुक्ती अध्यक्ष अशोक साळुंखे,सरपंच सतीश साळुंखे,उपसरपंच अमित साळुंखे,उदयसिंह साळुंखे,  बोरगाव सोसायटी चे सर्व सदस्य,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments