व्हा चेअरमनपदी
पांडुरंग गोविंदा धनावडे यांची बिनविरोध निवड.
मेढा / सुनिल धनावडे
मामुर्डी
सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती . आज अध्यासी निवडणूक
निर्णय अधिकारी रूपनवर साहेब यांचे अध्यक्षते खाली भरली होती . सदर सभेत या
निवडी बिनविरोध केरणेत आल्या . सदर सभेमध्ये मामुर्डी विकास सेवा
सोसायटीच्या चेअरमनपदी सावलीचे विनोद किसन जुनघरे तर व्हा चेअरमनपदी
मामुर्डीचे पांडुरंग गोविंदा धनावडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड
करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी रुपनवर साहेब म्हणाले सोसायटींने फक्त
कर्जवाटप व कर्जवसुली न करता व्यवसाय केला पाहीजे तरच या स्पर्धेच्या
युगात संस्था टिकतील .
सदर निवडी प्रसंगी संस्थेचे
मावळते चेअरमन व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान नवनिर्वाचित
संचालक आनंदराव जुनघरे यांनी सोसायटी स्थापने पासुनची बिनविरोधची परंपरा
कायम ठेवले बद्दल सोसायटीच्या सर्व संचालकांचे व सभासदांचे आभार मानले व
पुढील काळात ज्या ज्या वेळी संस्थेस मदत लागेल त्या वेळी मी वेळोवेळी मदत
करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रसंगी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक
आनंदराव धनावडे पाटील सोपान धनावडे जगाबाई भिलारे शामराव जुनघरे गणपत
जुनघरे सुर्यकांत सपकाळ आनंदा जुनघरे संजय कांबळे भाऊसो जंगम जयश्री सपकाळ
तसेच ज्ञानदेव जुनघरे ग्रा पं . सदस्य दिवदेववाडी रामचंद्र भिलारे तसेच
तंटामुक्त समीती मामुर्डीचे अध्यक्ष सुनिल आण्णा धनावडे उपस्थीत होते .
यावेळी संस्थेचे चेअरमन विनोद जुनघरे म्हणाले संस्थेचे संचालक हे माझे
पेक्षा खुप मोठे आहेत त्यांचे अनुभवाचा फायदा संस्थेस नक्कीच होईल . सर्व
संचालकोना बरोबर घेऊन संस्थेच कामकाज करणार . संस्थेचे संचालक जे डी जुनघरे
यांनी मनोगते व्यक्त केले संस्थेचे सचिव बापुसो धनावडे यांनी आभार मानले
.
0 Comments