भणंग : -: चुल आणि मूल या परंपरीक चालीरिताना डावलून आपणही समर्थपणे आपल्या पतीला आर्थिक हातभार लावू शकतो नव्हे तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाचा सांभाळ करू शकतो,अशा सातारा शहरातील पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार राष्ट्र सेवा दल सातारा शहर केंद्राच्या वतीने करण्यात आहे.
सातारा येथील मुक्तागंण येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लेक वाचवा अभियानाच्या प्रणेत्या ऍड. वर्षाताई देशपांडे,राष्ट्र सेवा दलाच्या शहर कार्याध्यक्ष साथी प्रा.मंगला साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऍड वर्षाताई देशपांडे या मार्गदर्शन केले, त्यावेळी त्या म्हणाल्या
" आज महिला अबाला नसून त्यादेखील स्ववलंबी होऊन सबला बनू पहात आहेत. त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन मिळावे व त्यांचा आदर्श इतर माता भगिनींनी घ्यावा,राष्ट्र सेवा दलाने या महिलांचा सन्मान करून जी प्रेरणा दिली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे."
प्रा.मंगला साठे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्र सर्व दलाची भूमिका सांगून,भावी पिढ्या संस्कारक्षम घडवण्या- बरोबरच आर्थिकदृष्टया सबल बनवू शकतात हाच आदर्श आज या सार्वजणींनी दाखवून दिला आहे "अश्या शब्दात त्यांचे कौतुक केले.यावेळी सौ.शहजान सय्यद व सौ.रेश्मा अडागळे यांनी मनोगते व्यक्त केली.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सौ.वासंती जगताप,सौ. रेश्मा अडागळे,सौ.शहनाज,
सय्यद,सौ.रसिका खंदारे व सौ.रेणुका करचे या पाच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या सर्वजणी आपले विविध व्यवसाय करून कुटुंबास हातभार लावत आहेत म्हणून त्यांचा सन्मानपत्र, मुलांसाठी स्वामी विवेकानंद ग्रंथ,प्रतिज्ञा हे यदुनाथ थत्ते लिखित पुस्तक,शॉल व राष्ट्र सेवा दलाची दिनदर्शीक देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस साथी प्रा.आनंद साठे यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.संजीव
बोंडे यांनी केले,यावेळी कार्यक्रमासाठी विजय आवळे, नामदेव अडागळे,शैलजा मॅडम केतन पवार,अनेक महिला व युवती उपस्थित होत्या.शेवटी कैलास जाधव यांनी आभार मानले.
0 Comments