कारला मागून डम्परने धडक दिल्याने मलकापूर-कऱ्हाड येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. पेठ ते सांगली रस्त्यावर आष्टानजीकच्या गाताडवाडी नजीक शनिवारी (ता. २६) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पोळ कुटुंबीय सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जात असताना हा अपघात घडला.मलकापूरचे व्यावसायिक अधिकाराव पोळ (४९), त्यांची आई गीताबाई (७०) पत्नी सुषमा (४२), भावजय सरिता सुभाष पोळ (३५) सर्व रा. पोळ वस्ती मलकापूर-कऱ्हाड) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातात पुतणी थोडक्यात वाचली. मलकापूर येथील पोळ कुटुंबीय शनिवारी सकाळी सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले.
कारमध्ये
पाच जण बसले होते. गाताडवाडी येथे समोरील वाहनाने ब्रेक मारल्याने पोळ
यांनीही कारचा ब्रेक दाबला. यावेळी मागून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या कारला
जोरात धडक दिली. त्यामुळे त्यांची कार मधोमध फसली. यातच चौघांचा मृत्यू
झाला. मागील वाहनाची जोरात धडक बसल्याने अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी
व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिस अपघाताची माहिती घेत आहेत. त्यानंतरच
सविस्तर माहिती मिळू शकते असे पोलिसांनी सांगितले.नागरिकांनी दिली अपघाताची
माहितीअपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
उपस्थितांपैकी कोणीतरी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले व
शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तसेच जखमीला जवळच्या रुग्णालयात
उपचारासाठी दाखल करण्यात आले.

0 Comments