कुसुंबी प्रतिनिधी
शिवप्रेमी मित्र समूह पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतापगड ते पिंपरी शिवज्योत आणण्यात आली.
या कार्यक्रमात सकाळी मेढा वरून मिरवणूक पिंपरीत आली त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली.
रात्री सात वाजता विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्था यांचे हरिपाठ आणि सुस्वर भजनाचा कार्यक्रम झाला .
महिलांसाठी
वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते त्यामध्ये संगीत खुर्ची ,मेणबत्ती
पेटविणे, हळदी कुंकू अशा कार्यक्रमाचा समावेश होता.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत पिंपरी ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला.शिव प्रेमी मित्र समूह यांचे वतीने महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला.

0 Comments