गेल्या जवळपास दोन वर्षात करोना आणि इतर कारणांमुळे सातारकर रंगकर्मींना आणि प्रेक्षकांना फारच अपवादाने रंगाविष्कार पाहण्यास किंवा सादर करण्यास मिळाला. आणि म्हणूनच सातारा रंगकर्मींच्या वतीने शुक्रवार दिनांक ११ मार्च रोजी पाठक हॉल, नगर वाचनालय सातारा येथे कै. अंजली वामनराव थोरात (थोरात बाई) यांच्या स्मरणार्थ सातारा रंगकर्मींच्या वतीने राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा खुला गट आणि शालेय गट (वय वर्ष १६ पर्यंत) अशा दोन गटात होणार आहे. या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. तीन मिनिटांपासून ते पाच मिनिटांपर्यंतची सादरीकरणे या स्पर्धेसाठी आपेक्षित आहेत. स्पर्धेसाठी खुल्या गटात अनुक्रमे ५,०००/- ३,०००/- २,०००/- आणि शालेय गटात ३,०००/- २,०००/- १,०००/- रोख रक्कम आणि प्रमाणपत्र अशी बक्षीसे असतील. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच इतर माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा. रविना गोगावले 9168812071, 9021982889
हत्तीखाना शाळेच्या माजी मुख्याध्यापिका कै. थोरात बाई यांचे सातारा नाट्यचळवळीत अत्यंत महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक हौशी नाट्य संस्थांना तालमीसाठी जागा उपलब्ध झाली. त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि त्यांचा रंगकर्मींना असणारा सदैव पाठिबा सातारकर रंगकर्मी कधीच विसरणार नाहीत. थोरात बाईंच्या ऋणाची थोडी तरी उतराई व्हावी या हेतूने त्यांच्या नावाने ही स्पर्धा स्पर्धेचे प्रमुख आयोजक सचिन मोटे यांच्या विचारातून आयोजित केली जात आहे. त्यांना या स्पर्धेच्या आयोजनात प्रसाद नारकर, जितेंद्र खाडिलकर, नितीन दीक्षित, रवीना गोगावले, प्रसाद देवळेकर, मिलिंद वाळिंबे, बाळकृष्ण शिंदे आणि संजय मोटे ही मंडळी मदत करत आहेत.
बाळकृष्ण शिंदे ८६२४८६९६८८
0 Comments