आनंद पळसे यांचा आदिवासी कल्याण संवर्धन संस्थेकडून सत्कार - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, November 25, 2022

आनंद पळसे यांचा आदिवासी कल्याण संवर्धन संस्थेकडून सत्कार

भेकवली : महाबळेश्वर सारख्या दुर्गम व डोंगराळ तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात अग्रेसर असणारे महाबळेश्वर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आंनद पळसे साहेब यांचा आज आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेचे महाबळेश्वर तालुका प्रमुख दादा धामुनसे याचे हस्ते सत्कार करण्यात आला.
 राज्यात आणि सातारा जिल्ह्यात अनेक तालुक्यात आदिवासी विभागाची  शिष्यवृत्ती मिळत असताना महाबळेश्वर तालुका मात्र यापासून वंचित होता ही बाब आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर संस्थेचे मार्गदर्शक  अविनाशजी ठोंबरे सर, सातारा जिल्हाअध्यक्ष  सदाशिव रुईघरे सर व जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या बाबतची आवश्यक कागदपत्रं घेऊन  दादा धामुनसे व इतर पदाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी पळसे साहेब यांची भेट घेतली. या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबतच्या अडचणी सांगितल्या यापूर्वी प्रस्ताव केले होते मात्र मंजूर झाले नाहीत असे त्यांनी सांगितले. यावर चालू शैक्षणिक वर्षातील आदिवासी सुवर्ण महोत्सवी योजनेचे प्रस्ताव भरून घेणे बाबतची  त्यांना विंनती करण्यात आली. यासाठी महाबळेश्वर तालुक्याचे पंचायत समिती सभापती संजय (बाबा) गायकवाड तसेच जिल्हा बँकेचे संचालक  राजेंद्रसेठ राजपुरे यांनी विशेष  लक्ष घातले. तालुक्यात शिष्यवृत्ती प्रस्ताव  भरून घेण्याची कार्यवाही सुरू झाली आणि आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेच्या प्रयत्नाने तालुक्यात प्रथमतः ३२८ विद्यार्थ्यांना आदिवासी शिष्यवृत्ती मिळाली. साहेबांनी स्वतः आदिवासी वंचित विद्यार्थ्यांसाठी  लक्ष दिल्याने मागील दोन वर्षात जवळपास १४ लाख रुपयांची आदिवासी  शिष्यवृत्ती महाबळेश्वर तालुक्याला मिळाली असून जिल्ह्यात सर्वाधिक शिष्यवृत्ती महाबळेश्वर तालुक्याला मिळालीआहे.आधीच सोई सुविधांपासून वंचित असणाऱ्या समाजातील विध्यार्थ्यांना सकारात्मक विचार करून न्याय मिळवून देणारे गट शिक्षण अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी कार्यालय वरिष्ठ लिपिक शेंडे अण्णा, अभिजित खामकर  कुलदीप अहिवळे यांचा गौरव  आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेच्या मार्फत  करण्यात आला.व आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष  संजय बाळू कदम, सनी केळगणे, महिला संघटक प्रियंका केळगणे, दिपक केळगणे निलेश धामुणसे, मंगेश केळगणे, सुरेश केळगणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment