दहिवडीत मटका अड्डयावर छापा, दोघांवर गुन्हा मटका बहादरांवर मोका लावण्याची ग्रामस्थांची मागणी... - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, November 25, 2022

दहिवडीत मटका अड्डयावर छापा, दोघांवर गुन्हा मटका बहादरांवर मोका लावण्याची ग्रामस्थांची मागणी...


दै. सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
गोंदवले ता. २५ :  दहिवडी ( ता. माण )येथील बस स्टँड परिसरामध्ये मटका व्यावसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना मिळताच सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता दोन बुकीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..
   दहिवडी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दहिवडी बस स्थानक परिसरामध्ये एसटी कॉलनी रोडवर असलेल्या शिवनेरी बारच्या समोर राहुल बाळकृष्ण शेंडे( वय ३२) राहणार एसटी कॉलनी दहिवडी ता. माण जिल्हा सातारा हा मटका मालक दादा उर्फ पांडुरंग जाधव याच्या सांगण्यावरून शिवनेरी बारच्या समोर हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी साईड स्टैंड वर उभा करून मोटर सायकलच्या पेट्रोलच्या टाकी वरती कल्याण नावाच्या मटक्याच्या चिट्ट्या लिहून ग्राहकाकडून पैसे घेताना त्याला दहिवडी पोलिसांनी मुद्देमालासह अटक करून त्याच्याकडून 57215 किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला.  सदर प्रकरणाचा पुढील तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन वावरे व बनसोडे करत आहेत..
 गेले कित्येक दिवसापासून दहिवडी बस स्थानक परिसर हा मटका व्यवसाय विक्रेत्यांच्या विळख्यात सापडला होता. परंतु दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि. अक्षय सोनवणे यांनी अनेक अवैध धंद्यावर कारवाया केल्या आहेत. त्यामुळे दहिवडे बस स्थानक परिसरातील मटका विक्रेत्या व्यवसायावरती त्यांनी पाळत ठेवून ही कारवाई केली आहे.
  सदर कार्यामुळे महाविद्यालय युवतीमध्ये अतिशय समाधानाचे वातावरण आहे कारण मटका व्यवसायामुळे या परिसरात अनेक दारुडे फिरत असतात त्यामुळे युवतीनां काही प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे या कारवाईने आता हा त्रास कायमचा बंद झाल्यामुळे महिला वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुन्हा या परिसरात मटका सुरू होऊ नये म्हणून सदर मटका चालकांवरती मोका अंतर्गत कारवाई करावा अशी ग्रामस्थांच्यातून मागणी होत आहे..

No comments:

Post a Comment