जनरल एस.एफ. रॉड्रिग्ज स्मृतीप्रित्यर्थ ‘राष्ट्रीय सुरक्षा @2047’ या विषयावर परिसंवाद* - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, September 19, 2024

जनरल एस.एफ. रॉड्रिग्ज स्मृतीप्रित्यर्थ ‘राष्ट्रीय सुरक्षा @2047’ या विषयावर परिसंवाद*


पुणे, 19 सप्टेंबर 24 

रेजिमेंट ऑफ आर्टलरी  आणि सेंटर फॉर लँड 
वॉरफेअर स्टडीज   यांच्या सहयोगाने जनरल एस.एफ. रॉड्रिग्ज स्मृतीप्रित्यर्थ परिसंवादाची दुसरी आवृत्ती 19 सप्टेंबर 2024 रोजी जनरल बिपीन रावत ऑडिटोरियम, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. माजी लष्करप्रमुख एस.एफ. रॉड्रिग्ज यांना आदरांजली म्हणून आयोजित केल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची संकल्पना ‘राष्ट्रीय सुरक्षा @2047’ अशी होती.
लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख,  जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ  यांच्या भाषणाने परिसंवादाला सुरुवात झाली.  भारतीय लष्कराचा लेखाजोखा आणि अमृत काळ – पुढील दिशा (क्षमता बांधणीचा आराखडा) या विषयांवर सत्रे घेण्यात आली. तसेच, एअर मार्शल (डॉ.) दिप्तेंदू चौधरी (निवृत्त) , यांनी आत्मनिर्भरता या विषयावर विशेष भाषण केले. त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेची उद्दीष्टे गाठण्यासाठी स्वावलंबी होण्याचा मुद्दा केंद्रस्थानी होता.
परिसंवादात राष्ट्रीय सुरक्षेबाबत लष्कर, आर्थिक आणि मुत्सद्देगिरीच्या अंगाने सविस्तर चर्चा झाली. प्रतिष्ठीत अनुभवी वक्त्यांनी आपल्या वैविध्यपूर्ण अनुभवाधारे चर्चेत मोलाची भर घातली आणि त्यातून भविष्यात अंमलात आणण्याजोगे पर्याय समोर आले. कार्यक्रमात विद्यमान आणि निवृत्त अधिकारी, तज्ञ व अभ्यासू आदी प्रतिष्ठीत व्यक्तिंचा सहभाग होता.
आर्टिलरी महासंचालक आणि आर्टिलरी रेजिमेंटचे वरिष्ठ कर्नल कमांडन्ट लेफ्टनंट जनरल अदोष कुमार  यांनी समारोपाच्या भाषणात परिसंवादात सहभागी झालेले प्रतिष्ठित वक्ते, श्रोते आणि आयोजकांचे आभार मानले. राष्ट्रीय सुरक्षेविषयी क्लिष्ट आव्हानांना सामोरे जाण्याप्रती नव्या उत्साहाने वचनबद्धतेसह परिसंवादाचा समारोप झाला.
***

No comments:

Post a Comment