भरतगाववाडी येथे बुधवारी 'श्रीं'चा भंडारापेढ्यांची यात्रा; 233 वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेला उत्सव - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, September 17, 2024

भरतगाववाडी येथे बुधवारी 'श्रीं'चा भंडारापेढ्यांची यात्रा; 233 वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेला उत्सव

शेंद्रे : सुमारे 233 वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेला श्री क्षेत्र भरतगाववाडी (ता. सातारा ) येथील श्री गजानन भंडारा उत्सव बुधवारी (ता. 18) होणार आहे.
त्या दृष्टीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

श्री क्षेत्र भरतगाववाडी येथील श्री गजानन भंडारा हा संपूर्ण जिल्ह्यात सर्वदूर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील जुन्या उत्सवांपैकी एक म्हणूनही त्याचा लौकिक आहे. हा उत्सव प्रामुख्याने 'पेढ्यांची यात्रा' म्हणूनही ओळखला जातो. उत्सवकाळात इथे गणेशाला पेढ्यांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. त्यातून
विविध भागांतील पेढे विक्रेते उत्सव काळात गावात दाखल होतात. इथला
पेढ्यांचा दरही उत्सव समितीच्या पुढाकाराने सर्वानुमते ठरविण्यात येतो. तो माफक असतो. त्यामुळे इथे हजारों किलो पेढ्यांची विक्री होती.

उत्सवकाळात सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. त्यालाही मोठी परंपरा आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता येथील सप्ताहाची सांगता हभप अनंत मिस्त्री कुसूंबीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता श्री गणरायाची भव्य रथयात्रा आयोजित करण्यात येणार आहे. सहभागी भाविकांसाठी पुरणपोळीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. श्री गजानन भंडारा रथोत्सवाचा लाभ परिसरासह जिल्ह्यातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment