माण मधल्या राजकारणासह समाजकारणाचे चिंचवणी संजय भोसले यांची घणाघाती टीका - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, October 9, 2024

माण मधल्या राजकारणासह समाजकारणाचे चिंचवणी संजय भोसले यांची घणाघाती टीका

आगामी विधानसभेसाठी माण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांसह ईच्छुक उमेदवारांनी बड्या बड्या बातांसह नव नव्या खेळांची थेरं मांडत आमिशांचा पाऊस पाडून राजकारण व समाजकारणाचं पूरतं चिचवणी केलेचे परखड मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे मांडले.
माण तालुका सर्वच सोयी सुविधांपासून कायम दुर्लक्षित व दुर्भिक्षित राहिलेला तालुका असलेचे अटल सत्य सर्वदूर माहित असताना मात्र माणमधील लोकप्रतिनिधीसह सर्व ईच्छुक उमेदवार गावभर हिंडत मोठ मोठ्या ढांगा मारत सुटलेले आहेत  हे त्यांचे अज्ञान की वेड समजावे हा जनतेसह आम्हाला पडलेला खरा तितकाच जटील प्रश्न आहे.
       परंतु आमदारकीच्या मोहात डुबून जनतेला मुर्ख बनविणारी माण तालुक्यातील अठरा पक्ष बदलणारी तसेच स्वार्थापायी कधीही एकत्र येणारी ईच्छुकांची टोळी यांना मतलबासाठी कोणत्याही पक्षनेतृत्वांनी डोक्यावरती घेतले तरी जनता मात्र अशां ढोंगीबाजांना डोक्यावरुन फेकून देणेस सज्ज असलेचे सरतेशेवटी भोसले यांनी म्हणतानाच ना पाणी,ना उद्योग,ना रोजगार परंतु करणमणुकीचे चाळे जोमात सुरु ठेवलेल्या या तमाशगिरांना ओळखून  जनतेने येत्या विधानसभेत आसमानी तारे दाखविण्याचे आवाहन भोसले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment