जातीचा खोटा पुळका असणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. आडवे येणाऱ्यांना आडवे करू: प्रशांत वीरकर - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, October 9, 2024

जातीचा खोटा पुळका असणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. आडवे येणाऱ्यांना आडवे करू: प्रशांत वीरकर

दहिवडी पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत विरकर, आनंदा मासाळ,सरपंच विलास खरात व उपस्थित कार्यकर्ते 
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
गोंदवले/ देवापूर :
माणचे गटविकास अधिकारी यांनी लडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात महिलांना कार्यक्रमाला येण्याचे तोंडी आदेश देऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी रजिस्टर घेऊन नोंदी करत असल्यामुळे अभयसिंह जगताप यांनी बीडीओंना हार घालून साडी चोळी भेट देऊन निषेध केल्या प्रसंगी माण मधील काही जातीचा खोटा पुळका असणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनी काल अभयसिहं जगताप यांचा निषेध केला . मात्र निषेध करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे असे वक्तव्य राष्ट्रवादी युवकचे माण खटाव विधानसभा अध्यक्ष प्रशांत विरकर यांनी दहिवडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी उपस्थित, सरपंच विलास खरात, आनंदा मासाळ,दिलीप विरकर,भागवत पिसे, प्रवीण मासाळ, नवनाथ शिंगाडे,दिलीप खरात, मा. सरपंच तानाजी अहिवळे , सरपंच नामदेव चव्हाण इत्यादी उपस्थित होते 
पुढे बोलताना प्रशांत विरकर म्हणाले की माण तालुक्यातील भाजप नेत्यांनी माण पंचायत समितीतील अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून काल एक निषेध आंदोलन त्या ठिकाणी केले.आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अधिकाऱ्यांशी कोणत्या पद्धतीने वागायचं कशा पद्धतीने वागायचं याचा सर्वश्रुत ज्ञान आम्हाला त्याची कोणी वेगळी शिकवण देण्याची काही गरज नाही त्या पद्धतीने आम्ही सोमवारी शांततेच्या मार्गाने जाऊन एक प्रतिकात्मक असं आंदोलन केले होते.त्यामध्ये साहेबांना आम्ही साडीचोळी भेट दिली होती.तेवढ्यासाठी की बीडीओ साहेबांनाच का तर जो महिला मेळावा आमदारांचे झाले त्यात महिला गोळा करण्याचं काम हे प्रत्यक्षरीत्या त्यांनी केलं म्हणजेच अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आशा वर्कर्स असतील यांना तोंडी आदेश देण्याचं काम बीडीओंनी केलं त्यामुळे त्यांचा या घटनेची थेट संबंध येतो म्हणून त्यांच्या विरोधात केलेले हे आंदोलन होते. यानंतर काही समाज घटकांनी एक असं वातावरण तयार केलं की बीडीओ हे धनगर समाजाच्या असल्यामुळे त्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले किंवा एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचे काम केले असा गैरसमज निर्माण केला.मीही धनगर समाजाचाच एक कार्यकर्ता आहे पण आम्ही जे आंदोलन केलं ते त्या पदाच्या खुर्चीच्या विरोधात आंदोलन केले होते.त्या पदाचा खुर्चीचा केलेला गैरवापर होता त्याच्या विरोधात केलेले हे आमचं आंदोलन होतं परंतु याला एक राजकीय आणि जातीचा रंग देण्याचे काम विरोधकांनी केलं त्यांना माझं एवढंच उत्तर आहे की तुम्ही ज्या अशा घटनेला जातीचा रंग देत आहे तर माणमधील तीन धनगर पत्रकार चांगले काम करत असताना त्यांच्यावर दबाव येतो त्यांना मारहाण होते त्यावेळे तुमचे जातीचे प्रेम कुठे जाते त्यावेळेस आपण का निषेध केला नाही.उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांचे पोस्टिंग इथे नको म्हणून काही लोकांनी गृहमंत्र्यांपर्यंत त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या होत्या.त्यावेळेस समाजाबद्दलचे प्रेम या लोकांचं कुठे गेलो होते.त्यानंतर अनेक लोकांनी समाजाच्या जमिनी हडप करण्याचे केले त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हे समाजकंटक कुठे गेले होते यातील कुणी पुढे येताना दिसलं नाही काल ज्यावेळेस निषेधार्थ आंदोलन पंचायत समितीत होत होतं त्यावेळेस त्या निषेधाच्या एकही आदर्श सरपंच त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. तर त्या ठिकाणी फक्त भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि तेही तिथल्या कर्मचाऱ्यांना दबावात घेऊन सत्तेचा वापरू करून यांनी ते आंदोलन केलं आणि ते आम्हाला शिकवतात की आम्ही अधिकाऱ्यांशी कशा पद्धतीने वागले पाहिजे आम्ही आंदोलन केले ते शांततेच्या पद्धतीने केले आम्हाला त्यांनी शिकविणे म्हणजे रावणाच्या टोळीन रामाच्या सैन्याला एक आदर्श आचारसहिता घालून दिल्यासारखं झाले.तुम्ही अधिकाऱ्यांना कोणती वागणूक देता कशा पद्धतीने वागवतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त काही शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. जाणून बुजून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आडवे करू असा कडक इशाराही त्यांनी दिला.

विलास खरात म्हणाले मी स्वतः सरपंच आहे धनगर समाजाबद्दल त्यांच्या वडिलांपासून बापूंच्या पासून पाठीमागच्या पंधरा-वीस वर्षाच्या काळापासून त्यांनी धनगर समाजाच्या स्वप्नांना लक्ष घालून प्रत्येकवेळी त्यांची ताकद वापरून समाजाला मोठे करायचे काम त्या कुटुंबाने केलेले आहे.त्यामुळे हे जे कुटुंब आहे या कुटुंबाला प्रत्येक समाज प्रत्येक समाजाला धरून राहणारे कुटुंब आहे. मी सरपंच पदावर आहे पण पूर्वीच्या वीस पंचवीस वर्षांपासून त्यांच्या वडिलांपासून त्यांनी धनगर समाजाला न्याय देऊन सन्मान केला आहे. त्यामुळे काल ज्यांनी राजकारणापोटी निषेध केला ते योग्य नाही असे प्रतिपादन त्यांनी केले.
आनंदा मासाळ म्हणाले की 
आम्ही जो निषेध केला तो पद आणि त्या खुर्चीच्या विरोधामध्ये केला.आणि त्या खुर्चीचा गैरवापर केलेल्याच्या विरोधामध्ये केले. पण काही समाजकंटक घोषित समाजाचे नेते भाजप प्रणित किंवा आमदारांचे बगलबच्चे म्हणलं तरी काही हरकत नाही त्यांना का अचानक समाजाचा पुळका आला. आणि राहिला प्रश्न काल-परवा भिडे यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला आंदोलन झाले ते आंदोलन बीडीओच्या होते शेंडगे साहेबांनी हा जो राजकीय कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या बाहेर ज्यावेळेला त्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून किंवा त्या आशा वर्करच्या माध्यमातून ज्या महिलांना गोळा करायला सांगितले होते. बीडीओ साहेबांना त्या राजकीय व्यासपीठाच्या बाजूला उभा करताना त्या आमदाराला लाज वाटायला पाहिजे होती.सगळ्यात पहिले तर ते आमदारांना लाज वाटायला पाहिजे की मी एका क्लास टू ऑफिसरला माझ्या राजकीय कार्यक्रमाला माझ्या राजकीय फायद्यासाठी मी त्या ठिकाणी त्यांना वापरतोय ही आमदाराला लाज वाटायला पाहिजे होती आणि जे स्वयंघोषित समाज बांधव म्हणतात की आमच्या समाजातल्या माणसाला या ठिकाणी टार्गेट केलं जातंय त्यांना मला एक सांगायचं आहे की तुम्हाला एवढंच समाजाचा पुळका होता तर तुम्ही त्या ठिकाणी आमदाराला प्रति प्रश्न करायला पाहिजे होता खरंतर की ह्या धनगर समाजाचा अधिकारी म्हणून तुम्ही असं करताय का की एक धनगर समाज अधिकाऱ्यांना तुम्ही राजकीय व्यासपीठाच्या बाजूला सत्कार आणि काही गोष्टी करायला सांगितल्या एखादा माणूस अधिकारी झाला की एखाद्या पदराजकीय असू द्या प्रशासकीय असू द्या त्या पदावरती ज्यावेळेला तो माणूस बसणार आहेत त्यावेळी तो कुठले एका विशिष्ट जातीचा विशिष्ट समुदायाचा असला जातो माणूस हा पूर्ण या व्हिडिओ असतील तर त्या तालुक्याचे हित घेऊन त्या ठिकाणी ते बसलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही कुठल्या एकच समाजाचं मी ज्या धनगर समाजामधून येतो आम्ही पहिल्यापासून समाजकार्यामध्ये छोटे-छोट्या पद्धतीने काम करतोय आम्ही कधी कुठल्या पक्षापर्यंत कधी असा आंदोलन केलं त्यामुळे कोणीही आम्हाला समाजाबद्दलचे प्रेम शिकवण्याची गरज नाही इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे कोणतेही समाजाचा अधिकार असू द्या आम्ही समाजावर कधी जात नाही.परंतु इथून पुढे कोणत्याही राजकीय कार्यक्रमात आमदाराच्या दबावाला बळी पडून एखादा अधिकारी जर त्या ठिकाणी काम करत असेल. तर त्याला जशास तसे उत्तर देऊ इशारा त्यांनी दिला.

 

No comments:

Post a Comment