मायणी :प्रतिनिधी तानाजी चव्हाण
मायणी ता.खटाव येथे दिनांक २६ डिसेंबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ अखेर दोन दिवसाचा सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचा मेळावा होत आहे.मायणी मल्हारपेठ रोडला मायणी पासून दीड किलोमीटर अंतरावर ७५ एकर जमिनीमध्ये आंबेडकर नगरमध्ये या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे.मानवता धर्म विकसित व्हावा सर्वधर्म समभावाची भावना वाढीस लागावी चारित्र्यसंपन्न नागरिक तयार व्हावेत तरुणांच्या मध्ये सद् विचाराची जोपासना व्हावी चारित्र्यसंपन्न नागरिक तयार होऊन आपल्या देशात अमन व शांतता निर्माण व्हावी त्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.मेळाव्यामध्ये दोन दिवस नमाज पठण प्रार्थना प्रवचन इत्यादी धार्मिक कार्यक्रमाबरोबर समाज प्रबोधनाचे काम केले जाणार आहे.समाजातील वाईट चालीरीती अनिष्ट रूढी परंपरा यापासून समाज मुक्त करून सद्विचार सद्भावना सदाचार भाईचारा वाढीस लागावा या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.तसेच मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी सामुदायिक विवाह शून्य खर्चामध्ये लावून दिले जाणार आहेत.या मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्यातून जवळपास अंदाजे २५ ते ३० हजार समाज बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मेळाव्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा जिल्ह्यातील विविध गावच्या समाज बांधवांनी उपलब्ध करून दिले आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेळाव्यासाठी लागणारी जागा मायणीतील संबंधित जागा मालकांनी उपलब्ध करून दिली असून त्या ठिकाणी गेले आठ दिवस समाज बांधव नियोजन करीत आहेत.या कामी मायणी ग्रामपंचायतचे सरपंच व त्यांचे सर्व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था मायणी ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करून दिली गेली आहे तसेच मायणीतील सर्व नागरिकांचे सहकार्य या मेळाव्यासाठी लाभत आहे.समाजामध्ये धार्मिक सलोखा निर्माण व्हावा.या दृष्टीने मायणीतील सर्व धर्मीय,सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे सहकार्य आहे.सदर मेळावा (इज्तेमा) उत्तम रीतीने पार पडावा म्हणून सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाज हाजी मजहरभाई कागदी,हाजी बरकत पटवेगार,हाजी जैनुद्दीन भादी,हाजी बशीर भाई कारभारी,हाजी युसुफभाई पटेल इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे या कामी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक माननीय घनश्याम सोनवणे साहेब तसेच मायणी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील साहेब ,पोलीस उपनिरिक्षक अमोल कदम साहेब व त्यांचे सहकारी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.मेळाव्यासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली असून मेळाव्यामध्ये सर्व आवश्यक सुविधा करण्यात आलेल्या आहेत.या मेळाव्यात वाहने सावकाश व शिस्तीने आणावीत व न्यावीत व हा मेळावा एक आदर्श मेळावा व्हावा या दृष्टीने सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment