जिल्ह्यातील पोलीस, अधिकार्‍यांची कमतरता भरून काढा, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, December 26, 2024

जिल्ह्यातील पोलीस, अधिकार्‍यांची कमतरता भरून काढा, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
कॅबिनेट मंत्रिपदाच्या रुपाने सातारा जिल्ह्याच्या पदरात भरभरून दान टाकणार्‍या महायुती सरकारने सातारा जिल्ह्यात पोलिस आणि अधिकारी यांची कमतरता भरून काढावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बालाजी  ट्रस्ट व ‘सवयभान’चे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकापत्राद्वारे केली आहे.
याबाबत चोरगे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  महाराष्ट्र राज्य 2024 च्या निवडणुकीत आपल्याला प्रचंड यश प्राप्त झाले आणि पुन्हा एकदा आपली मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून निवड झाली या बद्दल आपले विशेष अभिनंदन. आम्हाला विश्‍वास आहे की आपली कारकीर्द समाजासाठी आणि राज्यासाठी नक्कीच हितकारक होईल.सातारा जिल्ह्यात इतिहासात प्रथमच 1 उपुख्यमंत्रीपद आणि 4 कॅबिनेट मंत्री पद दिल्याबद्दल सातारकरांच्या वतीने आभार.
सातारा जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 32 लाखाचा वरती आहे. सातारा मध्ये एकूण 11 तालुके आहेत. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 10480 चौ. किलोमिटर वढे मोठे आहे.
सातारा जिल्ह्यात 100 पोलीस अधिकारी आणि 3000 पोलिस मंजूर आहेत. प्रत्यक्षात 70 अधिकारी आणि 2 हजार 900 पोलीस जवान कार्यरत आहेत.  या पैकी 5 टक्के सरासरी रजा, आजारपण यामुळे रोज कमतरता होत असते. शासनाच्या नियमनुसार 1 लाख लोकांच्या मागे 152 पोलीस जवान अशी संख्या असणे आवश्यक आहे. याचा अर्थ सातारची लोकसंख्या विचारात घेतली तर 5 हजार पोलीस जवान असणे आवश्यक आहे.
परंतु आजमितीस फक्त 2 हजार 900 काम करत असलेले पोलिस जवान धरले तर जवळ पास 2 हजार जवानांची यांची कमतरता आहे.
तसेच ट्रॅफिक चा विचार करता मुख्य सातारा शहरात 60 ट्रॅफिक पोलिस जवान  आणि 5 अधिकारी मंजूर आहेत तर त्या पैकी प्रत्यक्ष 45 कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच जिल्हा ट्रॅफिक मंजूर कर्मचारी 25 व 1 अधिकारी परंतु प्रत्येक्षात 20ते 22 जणच कार्यरत आहेत. तसेच जिल्ह्यात 10 ट्रॅफिक जवान (पीएसआय) अपेक्षित आहेत पण प्रत्यक्षात तीनचकार्यरत आहेत. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या व इतर जबाबदारी या मुळे ट्रॅफिक पोलिस यांच्या संख्येत सुद्धा वाढ करणे आवश्यक आहे.
शासकीय नियमानुसार आहे गरज
एकंदरीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच वाढत चाललेले अमली पदार्थांची बेकायदेशीर वाढ, वाढती बालगुन्हेगारी, वाढत चाललेले सायबर व इतर दैनंदिन गुन्हे, अपुरे रस्ते आणि पार्किंग सुविधा आणि व्यसनी रायडर यामुळे वाढलेले अपघात या सर्व बाबींवर नियंत्रण करण्यासाठी आपल्या सातारा जिल्ह्याला तातडीने वाढीव पोलिस आणि पोलिस अधिकारी यांची शासकीय नियमानुसार गरज आहे. असे आम्हाला वाटते, असे चोरगे यांनी या पत्रात नमूद केले आहे.
 यामुळे वाढणार ताण
महाराष्ट्राच्या नवीन मंत्री मंडळात सातारा जिल्ह्यात 1 उपुख्यमंत्री आणि 4 कॅबिनेट मंत्री पदे मिळालेली आहेत ही बाब आनंदाची आहे. परंतु आता त्यांच्या बंदोबस्त आणि कॅनव्हॉयसाठी ज्यादा पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांची गरज पडणार हे नक्की. याशिवाय सातारा जिल्ह्यात महत्वाच्या मंदिरासह 116 वेगवेगळी पर्यटन स्थळे आहेत त्यामुळे बाहेरून येणारे पर्यटक आणि त्यांची वाहने आणि वाढणारे ट्रॅफिक, तसेच    राष्ट्रीय कार्यक्रम, सनावळ, वेगवेगळे अध्यात्मिक कार्यक्रम या बाबत सातत्याने बंदोबस्त या मुळे पोलिस यंत्रणेवर ताण वाढत असल्याचे चोरगे यांनी या पत्रात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment