फलटणला गोडावून फोडले, दीड लाखांचे साहित्य लंपास - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, December 12, 2024

फलटणला गोडावून फोडले, दीड लाखांचे साहित्य लंपास


सत्य सह्याद्री
फलटण शहरातील महाराजा मंगल कार्यालयाशेजारी असलेले गोडावूनमधून एलईडी टीव्ही, आटा चक्की, फ्रीज, असे 1 लाख 65 हजार रुपयांचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य लंपास झाल्याची तक्रार व्यावसायिक विष्णू पांडुरंग सूळ (वय 49, रा. रामटेक अपार्टमेंट, लक्ष्मीनगर फलटण) यांनी नोंदवली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 22 नोव्हेंबर रोजी कामगार गोडावूनमध्ये गेले असता तेथे एलईडी टीव्ही मिळाला नाही. त्यावेळी अन्य साहित्य लंपास झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी सूळ यांनी गोडावूनची चावी असलेल्या डा्रायव्हर अजय कैलास चव्हाण व हँडलर श्रेयश रोकडे यांच्यावर संशय व्यक्त केला असून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. परंतु, आम्ही सामान नेले नाही, असे सांगून आम्हाला त्रास देऊ नका, अशी धमकी दोघांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment