सातार्‍यात शनिवारी गीतरामायण कार्यक्रम - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, December 27, 2024

सातार्‍यात शनिवारी गीतरामायण कार्यक्रम

सत्य सह्याद्री/सातारा
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नामजप व सौ. आशा दामले यांच्या स्मृतीनिमित्त शनिवारी 28 रोजी समर्थ सदन येथे अवघ्या आशा श्रीरामार्पण या गीत रामायणाच्या माध्यमातून राम तत्वाची मांडणी करणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राहूल इनामदार व आसावरी इनामदार यांनी दिली.
सायंकाळी सहा ते आठ या वेळेत होणार्‍या या कार्यक्रमात अभिजित पंचभाई, श्रुती देवस्थळी हे गायन करणार असून प्रसन्न बाम, अमित कुंटे, उद्धव कुंभार हे वादन करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल दामले यांचे आहे. सातारकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जितेंद्र दामले, शिल्पा दामले तसेच भरत दामले आणि स्नेहल दामले यांच्याकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment