Ticker

6/recent/ticker-posts

जळव घाटात पीकअप पलटी; एक ठार, २० जखमी

पाटण, दि. २४ : जवळ जोतिबा अन निवकणे येथील जानाईदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पीकअप वाहनाचा जळव घाटात अपघात होऊन एक महिला ठार तर २० जण जखमी झाले. घाटातील अवघड वळणावर ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला.
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हिवरे (ता. कोरेगाव) येथील २० ते २२ जण पीकअप वाहनातून दर्शनासाठी निघाले होते. सकाळी सुमारे अकराच्या सुमारास जळव घाटातील एका वळणावर वाहनाचे ब्रेक निकामी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले.
या अपघातात वंदना विठ्ठल काकडे (वय ५५) यांचा मृत्यू झाला. सुलोचना शिंदे, पंढरीनाथ काकडे, विठ्ठल काकडे, लता खरात, किरण शिंदे, विद्या काकडे, प्रभावती काकडे, शालन खताळ, केशव जगदाळे, छाया खताळ, रुक्मिणी काकडे, आबाजी खताळ, दाजीराम खताळ, सिंधू शिंदे, एकनाथ काकडे, शकुंतला खताळ, शंकर खताळ, शांताबाई खताळ तसेच चालक बापू खताळ हे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथे हलवण्यात आले.

Post a Comment

0 Comments