Ticker

6/recent/ticker-posts

दहिवडी पोलिसांकडून सहा गुन्हे उघड एकास अटक

 


दहिवडी : मोटारसायकल, विहीर बोअरवेल मोटार अन दागिने चोरी प्रकरणी दहिवडी पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीस अटक केली. या कारवाईत ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी खुर्द येथील पोलीस पाटील महेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनंतर प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला. तपासादरम्यान सागर पोपट चव्हाण (रा. शिरवली, ता. माण) यास ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपीने विविध ठिकाणी घरफोडी व चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाचवड येथील घरफोडीतील सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी तसेच मोटारसायकल, विहीर बोअरवेल मोटार असा एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांचा उलगडा झाला असून पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments