Ticker

6/recent/ticker-posts

मारामारी प्रकरणी जावळीतील तिघांना शिक्षा; मुख्य आरोपीला सश्रम कारावास


मेढा : जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथे झालेल्या मारामारी प्रकरणात न्यायालयाने तिघा आरोपींना दोषी ठरवत सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, मेढा न्यायालयाने हा निकाल दिला.
दि. ७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिंदेवाडी हद्दीत ही घटना घडली होती. फिर्यादी विनोद हणमंत चव्हाण हे त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेले असता आरोपी लक्ष्मण सदाशिव शिंदे, सुरेश सिताराम शिंदे आणि अक्षय बाजीराव शिंदे हे तेथे उपस्थित होते. यावेळी झालेल्या वादातून आरोपींनी चव्हाण यांना लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले तसेच लाथाबुक्यांनी मारहाण व दमदाटी केली होती.
या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. खटल्यादरम्यान सादर पुरावे व साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले.
न्यायालयाने मुख्य आरोपी लक्ष्मण शिंदे यास सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच इतर आरोपी सुरेश शिंदे व अक्षय शिंदे यांना प्रत्येकी सहा महिने कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
या प्रकरणाचा तपास मेढा पोलीस ठाण्याने केला असून न्यायालयीन कामकाजात सरकारी पक्षातर्फे कामकाज पार पडले.

Post a Comment

0 Comments