सत्य सह्याद्री
वीज चोरी करून त्याचे तडजोड देयक देऊन तेही न भरणाऱ्या एका दाम्पत्यासह मायणीतील तिघांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सलीम गणी नदाफ तसेच संतोष सिद्धेश्वर पुस्तके व अश्विनी संतोष पुस्तके (सर्व रा. मायणी), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पुस्तके दाम्पत्याला ६१ हजार ५९० रुपयांच्या वीजचोरीप्रकरणी २५ हजार रुपये तर नदाफ याला १ लाख ६३ हजार ६४० रुपयांच्या वीजचोरी देयकापोटी ३४ हजार रुपयांचे तडजोड बील देण्यात आले होते. याप्रकरणी वैभव जगन्नाथ मदने (वय ३७, रा. सातारा) यांनी फिर्याद दिली. तपास हवालदार गंबरे व हवालदार कारंडे करत आहेत.

0 Comments