सत्य सह्याद्री/गोंदवले
भालवडी, ता. माण येथील स्वप्नाली महेश कदम या २२ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दि. ९ रोजी घडली. याप्रकरणी संभाजी एकनाथ काटकर यांनी फिर्याद दिली असून म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. त्यांच्या लग्नाला ३ वर्षे झाली असून घटनास्थळी उपअधीक्षक रणजित सावंत यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. तपास हवालदार खाडे करत आहेत.

0 Comments