सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
ढेबेवाडी: ढेबेवाडी बाजारपेठेत भरदिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरी करून चोरट्यांनी दुचाकीवरून घटनास्थळावरून पोबारा केला. त्यांचा दुकानदार तसेच काही युवकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करणाऱ्यांनाच्या डोळ्यात चटणी फेकून चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.
घटनास्थळावरून व मिळालेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी बाजारपेठेतील मगर बंधू ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी झाली. याबाबत माहिती अशी विनोद मगर यांचे ढेबेवाडी बाजारपेठेत मगर बंधू ज्वेलर्स दुकान अनेक दिवसापासून आहे ते एक प्रतिष्ठित सोना चांदीचे दुकानदार आहेत. आज ते स्वतः त्यांचा मुलगा विराज व दोन कामगार दुकानात होते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक चोरटा चांगल्या वेषात दुकानात वस्तू घेण्याच्या बहाण्याने आला तो वस्तू हाताळत होता त्याचे दर विचारून व्हिडिओ कॉल करून कोणाला तरी दाखवत होता मगर यांचा चिरंजीव विराज त्याला वस्तू दाखवून काहीतरी लिहत होता या संधीचा फायदा घेऊन त्याने तीन वस्तू घेऊन पळत सुटला. यावेळी दुसरा थोड्याशा अंतरावर पुढे दुचाकी घेऊन रस्त्यावर थांबला होता त्याच्या गाडीवर बसून त्यांनी पोबारा केला. त्यांचा पाठलाग गोरख मोहिते या धाडसी युवकाने व काही युवकांनी तसेच मगर बंधूंनी केला घाट मार्गात गेल्यानंतर त्याने पाठीमागून पाठलाग करणाऱ्या वीराज मगर व त्याच्या बरोबर असणाऱ्या एकाच्या डोळ्यात चटणी फेकली व सुसाट निघून गेले, हे दोघे चोरटे दिवशी घाटमार्गे पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे. ते नवारस्ता येथे थांबून काही तरी घेऊन गेल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा काम उशिरापर्यंत चालू होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.भरदिवसा बाजारपेठेत घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

0 Comments