Hot Posts

6/recent/ticker-posts

दुकानाच्या व्यवहारातून वाद; नगरसेवक सागर पावशेंसहपाच जणांवर गुन्हा


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा: दुकान गाळ्याच्या दस्त व्यवहारातील पैशांच्या वादातून पांडुरंग दत्तात्रय पवार (वय ५१, रा. शनिवार पेठ, सातारा) यांना मारहाण केल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी नगरसेवक सागर अशोक पावशे यांच्यासह पाच जणांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पवार दुचाकीवरून मोती चौक ते फुटका तलाव या मार्गाने जात होते. पेंढारकर दवाखान्याजवळ थार मोटारीतून आलेल्या पाच जणांनी त्यांना अडवले. दुकान गाळ्याच्या व्यवहारातील ३४ हजार रुपये देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वेळी दीपक कदम याने हातातील वस्तूने पवार यांच्या डाव्या डोळ्याखाली मारहाण केली. इतरांनीही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सागर पावशे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी विशाल मोने, राजू मोरे, गणेश साळुंखे, दीपक कदम आणि सागर पावशे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिला पोलीस नाईक करपे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments