Hot Posts

6/recent/ticker-posts

लिंबमध्ये भरदिवसा घरफोडी; दागिने, रोकड चोरीला



घराच्या दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केलेल्या चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि पितळी भांडी असा ६० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. सातारा तालुक्यातील लिंब येथील यादव मळा परिसरात १४ ऑक्टोबर रोजी भरदिवसा ही घटना घडली.

याबाबत रंजना शशिकांत जाधव (वय ६५, रा. यादव मळा, लिंब) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत त्यांच्या घरात चोरी झाली. घराच्या दरवाजाची कडी काढून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू आणि रोकड घेऊन पोबारा केला.

सायंकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वस्तीतील घराला लक्ष्य करून चोरट्याने भरदिवसा चोरी केल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शिंदे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments