Hot Posts

6/recent/ticker-posts

पुसेगाव (ता. खटाव) येथील तरुणाची मानसिक तणावातून आत्महत्या

पुसेगाव

खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील एका ३९ वर्षीय तरुणाने मानसिक तणावाखाली विषारी औषध प्राशन करून आणि हाताची नस कापून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विक्रम औदुंबर पिसाळ (वय ३९, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्यापूर्वी मौजे खटाव गावच्या हद्दीतील गणेश पोवई मंदिरासमोरील वनीकरणात ही घटना घडली. मयत विक्रम पिसाळ याने अज्ञात मानसिक तणावातून 'कॅप्टन' नावाचे विषारी औषध प्राशन केले. तसेच, आपल्या उजव्या हाताच्या मनगटाजवळील नस कापून घेतली. विषबाधेमुळे रक्ताच्या उलट्या होऊन आणि अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मयताचे मावस भाऊ चेतन श्रीकांत आपटे (वय ३३, व्यवसाय- हॉटेल, रा. कोरेगाव, जि. सातारा) यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मयत (कलम १९४ बी.एन.एस.एस. प्रमाणे) अशी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन उपअधीक्षक श्रीमती कोमल शिंगाडे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे 
यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. बी. बर्गे करत आहेत.

Post a Comment

0 Comments