Hot Posts

6/recent/ticker-posts

एनकूळ विकास सेवा सोसायटी बरखास्त

सत्य सह्याद्री/वडूज

 खटाव तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या एनकूळ विकास सेवा सोसायटी बरखास्त करून संस्थेवर प्रशासक नेमणूक करण्याचे आदेश खटाव तालुका सहाय्यक निबंधक यांनी दिले.
याबाबतची अधिक माहिती अशी, मयत सभासदांची वारस नोंद करण्यात टाळाटाळ, कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना सभासद करून घेण्यास नकार तसेच राजकीय सोयीसाठी पात्र सभासदांना कर्ज व शासनाच्या इतर योजनांपासून वंचित ठेवणे आदी संदर्भात भाजपा नेते सदाभाऊ खाडे (पुणेकर) यांनी सहकार खात्याकडे तक्रार केली होती. तक्रारदारांच्या वतीने ॲड.एस. व्ही. जम्बुरे यांनी केलेला युक्तिवाद तसेच सत्ताधारी गटाची बाजू ऐकून घेऊन सहाय्यक निबंधकांनी संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेवर प्रशासक नेमण्याचे महत्वपूर्ण निर्देश दिले.
या निर्णयामुळे सत्ताधारी गटाचे नेते व जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रा.अर्जुनराव खाडे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.
चौकट: कदम यांची प्रशासक म्हणून नियुक्ती..
याबाबत सहाय्यक निबंधक गीतांजली कुंभार यांच्यासी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासक कारवाईस दुजारा दिला असून जिल्हा बँकेचे विकास अधिकारी अविनाश अंकूश  कदम यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे सांगितले. या निर्णयावर सत्ताधारी गट कोल्हापूर विभागीय जॉइंट रजिस्टर यांच्याकडे आपली कैफियत मांडणार की नव्याने निवडणुकीला सामोरे जाणार याकडे परिसरातील लोकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments