Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटण बाजार समिती तर्फे श्रीमंत रामराजे ना निंबाळकर शेतकरी व्यथा निवारण केंद्राची स्थापना



विक्रम चोरमले (फलटण)
फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती ने अन्नदाता सम्मान योजना अंतर्गत "श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी व्यथा निवारण केंद्र" यांची स्थापना करण्यात आली आहे.

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दैनिक सत्य सह्याद्रीशी बोलताना सांगितले की शेतकरी आत्महत्या बाबत सखोल विचार करून, शेतकरी आत्महत्या का करतो याच्या मुळाशी जाऊन विचार केला असता तो कर्ज, कृषि, गृह, महसूल या अडचणी व इतर अडचणी मुळे आत्महत्या करतो असे लक्षात आल्यामुळे, शेतकऱ्याला मोफत कायदेशीर सल्ला देण्यासाठी व्यथा निवारण कक्ष सुरू केले आहे,

सादर कक्ष सध्या प्रायोगिक स्वरूपात सुरू केले असता त्यास प्रचंड प्रतिसाद लाभत आहे, १ जानेवारी २०१८ पासून शेतकरी वर्गाला एक मोबाईल ऍप देत आहोत, तो घरी बसून ही तक्रार करू शकेल, आणि जो शेतकरी ऍप वापरू शकत नाही तो बाजार समितीत येऊन निवारण केंद्रात  येऊन तक्रार करेल.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी व्यथा निवारण केंद्र सुरू झाल्यापासून फलटण तालुक्यातील अनेक शेतकरी येऊन त्याची व्यथा मांडत आहेत, सावकारी विरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत, त्यांचे निपटारा करण्याचे काम साध्य चालू आहे, आणि अनेक लोकांना न्याय मिळाला देखील आहे.सध्या शेतकरी वर्गास महावितरण कंपनी कडून चुकीची वीज बिल दिली गेली आहेत, ज्या शेतकऱ्यांना चुकीची वीज बिल दिली गेली आहेत त्याबाबत संबंधित महावितरणकार्यालयास पत्र देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी ज्या लोकांना शासकीय किव्वा सावकारी अडचणी असतील त्यांनी कृषी उत्पादन बाजार समिती फलटण येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी व्यथा निवारण केंद्राशी संपर्क करावा असे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण येथील अन्नपूर्णा शेतकरी कॅन्टीनमध्ये "अन्नदाता सन्मान योजना" हा अंतर्गत संलग्न उपक्रम लवकरच सुरू करणार आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त १२ रुपये एवढ्या नाममात्र दरात १९ नोव्हेंबर पासून जेवणाची सोय करण्यात आली आहे.

दैनिक सत्य सह्याद्रीशी बोलताना फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून पुढील कालावधीत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनां व उपक्रम माहिती दिली अनेक योजनांना शासकीय स्तरावर मंजुरी मिळाली आहे. विविध योजना व उपक्रम सुरू करण्याबाबत काम सुरू असून आगामी काळात जास्तीत जास्त सेवा देण्याचा व विविध योजना फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत राबवण्याचा प्रयत्न असणार असून निश्चितच फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श रोल मॉडेल ठरणार आहे. फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त बाजार समितीपुरती मर्यादेत सेवा देणारी न राहता शेतकरी बंधूंना केंद्रस्थानी ठेवून विविध आवश्यक व गरजु अशी सेवा देणारी बाजार समिती असणार आहे. शेतकरी बंधूंच्या आवश्यक गरज लक्षात घेऊन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध योजना, उपक्रम राबविण्यात येणार आहेत निश्चितच येणाऱ्या काळात फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संपुर्ण महाराष्ट्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणार आहे.

Post a Comment

1 Comments

  1. खूप छान उपक्रम, आणि सत्य सह्याद्री तर्फ़े उत्कृष्ट मांडणी

    ReplyDelete