सातारा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शिवथर ता. सातारा गावच्या हद्दीत लोहमार्गावर आगगाडीखाली प्रेमी युगुलाने एकमेकांना मिठी मारुन आपले जीवन संपवले अनिल चव्हाण (वय 28) व पूजा शिंदे (वय 17 दोघे रा.बसाप्पाचीवाडी ता.सातारा) अशी मृतांची नावे आहेत.
घटनास्थळावरून व पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल व पूजा बुधवार पासून बेपत्ता होते. गुरुवारी सकाळी दोघेही दुचाकीवरुन शिवथर गावच्या हद्दीतील मिरज-पुणे लोहमार्गानजीक गेले. दुचाकी बाजूला लावल्यानंतर साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोघेही एकमेकांना मिठी मारुन े रुळावर झोपले. याच दरम्यान आलेल्या गाडीखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. ही बाब नजीक असलेल्या वाचमनच्या लक्षात आल्यानंतर त्याने या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला ाजदली.
रेल्वे पोलीस व सातारा तालुका पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर प्रथम दोघांची ओळख पटवण्याचे काम केले. दोघांची ओळख पटल्यानंतर याबाबतची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. पंचनामा झाल्यानंतर दोन्ही मृतदेहांचे जिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टेम करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार अनिलचा विवाह झाला असून पूजा दहावीत शिकत होती.
0 Comments