सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, August 31, 2018

सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


सातारा: सातारा शहरातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे बांधकाम सुरु असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्याच्या अनुषंगाने वाहतुक मार्गात बदल केले आहेत.



शाहू चौक ते पोवई नाका जाणारा मार्गावरील भीमाबाई आंबेडकर विद्यालय गेट ते रविवार पेठ, लोणार गल्लीमध्ये प्रवेश करणारा मार्गापर्यंत ग्रेड सेपरेटरच्या कामावरील वाहनांच्या व्यतिरिक्त सर्व वाहनांना ये-जा करणे बंद करण्यात आले आहे.  मरिआई कॉम्प्लेक्स ते शाहू चौक हा मार्ग एक दिशा मार्ग करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर ते लोणार गल्ली सावंत घर कॉर्नर चौक हा मार्ग एक दिशा मार्ग करण्यात आला आहे. राजपथाकडून येऊन सिव्हील हॉस्पीटल सातारा, जिल्हाधिकारी कार्यालय व गोडोलीकडे जाणारी सर्व वाहने जुने बगाडे हॉस्पीटल चौक - वाहतूक नियंत्रण शाखेसमोरुन - लोणार गल्ली, आय.डी.बी.आय. बँक ते मोनार्क चौक, बढीयां पेट्रोलपंप अशी मार्गस्थ होतील. सातारा सिटी लॉकअप ते नगर पालिका कार्यालय हा मार्ग एक दिशा मार्ग करण्यात आला आहे. या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवून सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment