‘रयत’च्या स्थापनेचा इतिहास ‘संस्थेला’ मान्य, कालेत होणार 50 लाखांची सुसज्ज इमारत - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, August 31, 2018

‘रयत’च्या स्थापनेचा इतिहास ‘संस्थेला’ मान्य, कालेत होणार 50 लाखांची सुसज्ज इमारत


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


काले: कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांनी कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. हा इतिहास अखेर संस्थेने मान्य केला आहे. यासंदर्भात सातारा येथे झालेल्या बैठकीत संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनीही शिक्कामोर्तब केल्याने काले ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या लढाईला यश आले आहे.



काले येथील शेकडो ग्रामस्थांनी सातारा येथे जाऊन चेअरमन डॉ. अनिल पाटील यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. तब्बल दोन तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर डॉ. अनिल पाटील यांनी हा इतिहास मान्य केला. शिवाय काले येथे शाळेच्या नवीन इमारतीची मागणी मान्य करत संस्थेकडून 40 लाख व इतर देणगीदारांकडून 10 लाख अशा 50 लाख रुपये रकमेला मंजुरी दिली.


महत्वाची गोष्ट म्हणजे या नवीन इमारतीचे भूमिपूजन रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या सुरुवातीला 4 ऑक्टोबर 2018 रोजी काले येथे होणार आहे.  इमारत बांधायला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.या वेळी काले येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, यावेळी ग्रामस्थांनी कर्मवीरांच्या समाधीला अभिवादन करून आनंद व्यक्त केला. हे वृत्त समजताच काले येथे आनदोत्सव साजरा करण्यात आला.


No comments:

Post a Comment