येराड येथे दुचाकी अपघातात एक ठार, 4 गंभीर जखमी - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, September 7, 2018

येराड येथे दुचाकी अपघातात एक ठार, 4 गंभीर जखमी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण :  पाटण-कोयना मार्गावर येराड गावच्या हद्दीत शुक्रवार (आज) दि. 7 रोजी दोन दुचाकी स्वरांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवर मागील बाजूस बसलेल्या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कराड येथे पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत पाटण पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबत अधिक माहिती अशी, कोयना विभागातील कराटे येथील किरण कृष्णात सूर्यवंशी हे आपले दोन भाचे किरण रमेश चव्हाण (वय 13) आणि महेश रमेश चव्हाण (वय 15 दोघे रा. पाटण) याना दुचाकी गाडीवरून (क्र. एम.एच. 08. यु. 8768) ट्रिपल सीट घेऊन कराटे गावाकडे निघाले होते. तर सागर नाना घाडगे (वय 35, रा. उंब्रज) आणि मोहन साहेबराव भिसे (वय 40, रा. अंबापूर निगडे) हे दोघे दुचाकी गाडीवरून कोयनानगरहुन उंब्रज बाजूला निघाले होते. 
या दोन्ही दुचाकी गाडीची येराड गावच्या हद्दीत जोरदार समोरासमोर धडक बसल्याने दोन्ही गाडीवरील सर्वजण रस्त्यावर फेकले गेले. यात पाटण (रामपूर) येथील महेश रमेश चव्हाण (15) याचा डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. तर किरण कृष्णात सूर्यवंशी, किरण रमेश चव्हाण, सागर नाना घाडगे, मोहन साहेबराव भिसे हे 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 
या अपघाताची नोंद उशिरा पाटण पोलिसात करण्याचे काम सुरु होते. दरम्यान पाटण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर महेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. याचा अधिक तपास सपोनि यु. एस. भापकर करत आहेत.

No comments:

Post a Comment