'एक घास केरळ ग्रस्तासाठी' या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, September 4, 2018

'एक घास केरळ ग्रस्तासाठी' या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

फलटण  :- शिवछत्रपती युवक प्रतिष्ठान व गणेश उत्सव मंडळ लक्ष्मीनगर डी एड कॉलेज फलटण यांनी सालाबादप्रमाणे याहीवर्षी दि. 6 सप्टेंबर रोजी दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे. मागील अकरा वर्ष या प्रतिष्ठान कडून दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी प्रतिष्ठान कडून 'एक घास केरळ ग्रस्तासाठी' अशा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


केरळमध्ये ११ जिल्ह्यातून पूरस्थितीने थैमानाने मोठे नुकसान झाले आहे.तसेच यामध्ये तीनशेपेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे.लाखो नागरिक बेघर झाले आहेत. शिवछत्रपती युवक प्रतिष्ठान व व गणेश उत्सव मंडळ लक्ष्मीनगर यावर्षी यांनी दि. 6 सप्टेंबर रोजी डी एड कॉलेज चौक येथे सायंकाळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य यांची धान्याची तुला करणार असून वजनाच्या शंभर पट धान्य केरळ ग्रस्तासाठी पाठवण्यात येणार आहे. फलटण मधील नागरिकांनी केरळच्या पुर ग्रस्तांच्या धान्य स्वरूपात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन शिवछत्रपती युवक प्रतिष्ठान व गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे. या उपक्रमामध्ये धान्य स्वरूपात मदत करण्यासाठी विशाल कणसे- 9921117799, विनोद शिंदे-9922392977, प्रविण फडतरे- 9881117799 या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment