वेळे येथे रस्ता ओलांडून जाणाऱ्या गाडीचा अपघात, दोन्ही गाडीचे प्रचंड नुकसान - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, December 25, 2018

वेळे येथे रस्ता ओलांडून जाणाऱ्या गाडीचा अपघात, दोन्ही गाडीचे प्रचंड नुकसान


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क

वेळे :- वेळे येथे हॉटेल विशाल समोर स्विफ्ट (वाहन क्र. एम एच 14 एफ एम 4583) व इनोव्हा (वाहन क्र. एम एच 06 ए डब्ल्यू 6028) यामध्ये आज दुपारी दोनच्या दरम्यान अपघाता झाला. यात कोणीही जखमी झाले नाही.


याबाबत माहिती अशी की, स्विफ्ट व इनोव्हा या दोन्ही गाड्या पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने येत होत्या. इनोव्हा गाडीला वेळे येथील दुभाजकावरून जायचे होते. त्यामुळे चालकाने वाहनाची गती कमी करून वळण घेण्यासाठी ब्रेक दाबला. परंतु पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट गाडीचा वेग भरधाव होता. चालकाला गाडी अनावर होऊन पुढे असणाऱ्या इनोव्हा गाडीला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की दोन्ही गाड्या जागेवरच वळल्या. या अपघातात दोन्ही गाड्यांचे भरपूर प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे परंतु कोणीही जखमी झाले नाही.

No comments:

Post a Comment