वरकुटे-मलवडीत बिगरहुंडा सर्व धर्मीय सामुदायिक मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, December 25, 2018

वरकुटे-मलवडीत बिगरहुंडा सर्व धर्मीय सामुदायिक मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन

दुष्काळात सापडलेल्या माणदेशातील वधूपित्यांना श्रीमती फुलाबाई बापू नरळे सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट व साईसागर फौंडेशन देणार मायेचा आधार

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क


वरकुटे-मलवडी- दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सर्व सामान्य जनतेच्या मुला-मुलींच्या विवाहाची चिंता दूर करण्यासाठी आणि आईने दिलेल्या संस्कारातून समाजाची सेवा करण्यासाठी,मा.कोकण आयुक्त प्रभाकरजी देशमुख यांच्या प्रेरणेने तानाजी बापू नरळे यांनी श्रीमती फुलाबाई बापू नरळे सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट व साईसागर फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वरकुटे मलवडी येथे  रविवार दि.३० डीसेंबर २०१८ रोजी,सकाळी १० ते-दु.१ वा.पर्यंत पालक परिचय मेळावा होणार आहे.व सायं. ५ वाजता सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.यासाठी वधू-वरांचे संपूर्ण पोशाख व ५१ भांड्यांचा संसार सट भेट म्हणून देण्यात येणार आहे. यामुळे वधु पित्यांना ऐन दुष्काळात जिव्हाळ्याचा मोठा आधार मिळणार आहे.



माण तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्यामुळे खरीप व रब्बीची पीके हातची गेली आहेत,ओढे, विहरी, तलाव कोरडेठाक पडल्याने पाण्याचेही मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे तसेच हाताला काम नसल्याने पैशाची मोठी अडचण आहे. अशा भयानक दुष्काळाच्या परिस्थितीत सर्व सामान्य शेतकरी, शेतमजूरांना आपल्या मुला-मुलींचे लग्न कसे करावेत, हा प्रश्न सतत भेडसावत आहे... मात्र वरकुटे-मलवडी येथील पुणे येथे स्थायिक असलेले तानाजी नरळे या माऊलीने माणदेशातील वधुपित्यांना लागलेली चिंता दूर करून बिकट परिस्थितीत त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.त्यामुळे होणा-या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून त्यांना हा आधार मिळणार आहे.



येत्या रविवारी ३० डिसेंबर रोजी सर्वधर्मीय सामुदायिक मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाहेच्छूक वधू वरांना किंवा त्यांच्या पालकांना २६ डिसेंबर २०१८ पर्यंत नांव नोंदणी करता येणार आहे.विवाहाची नोंदणी पुर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, मात्र नोंदणीसाठी जन्माचा दाखला,रेशनींगकार्ड आधार कार्ड, वधू व वरांचे पासपोर्ट आकाराचे प्रत्येकी दोन फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक श्री.तानाजी नरळे यांनी केले आहे.

विवाह नोंदणीसाठी संपर्क :-    ह.भ.प.गणपतराव वाघमोडे मो.९०७५१४५५००, संजय जगताप सर मो.९५६१८८९०११, एल.डी.नरळे मो.८६०५०५९५०७


No comments:

Post a Comment