भाविकांच्या जीपला अपघात; ३ ठार तर १२ जखमी (breaking news) - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, December 22, 2018

भाविकांच्या जीपला अपघात; ३ ठार तर १२ जखमी (breaking news)


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क  - सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील भोजलिंग देवस्थान येथून देवदर्शनावरुन परत येत असताना 200  फूट खोल दरीत भाविकांची जीप कोसळून झालेल्या अपघातात ३ महिला जागीच ठार तर १२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

 

म्हसवड पासुन १३ किलोमीटर अंतरावर जांभुळणी गावानजीक डोंगरमाथ्यावर भोजलिंग हे प्रसिद्ध देवस्थान आहे. येथील मंदीराकडे जाण्यासाठी जांभुळणी तसेच वळई गावाकडून रस्ते आहेत. भोजलिंगाच्या दर्शनासाठी आलेले हे भाविक विठलापूर (ता. आटपाडी) येथील असल्याचे माहिती मिळत आहे. जांभुळणीकडील डोंगर उतारावरुन खाली येत असताना जीप चालकाचा ताबा सुटून जीप खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. या अपघातात ३ महिला जागीच ठार झाल्या. तर इतर १२ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालय म्हसवड आणि साबळे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment