उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठी कोयना धरणास देशपातळीवरचा पुरस्कार, कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मात्र जैसे थे, - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, December 19, 2018

उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठी कोयना धरणास देशपातळीवरचा पुरस्कार, कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मात्र जैसे थे,

सत्यसह्याद्री न्यूज नेटवर्क 
संजय कांबळे: पाटण 
केंद्रिय सिंचन आणि ऊर्जा मंडळ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा उत्कृष्ठ धरण व्यवस्थापनाचा देशपातळीवरील पुरस्कार पाटण तालुक्यातील कोयना धरणाला नुकताच जाहीर झाला आहे . महाराष्ट्राच्यासह सातारा जिल्हा पाटण तालुक्या साठी  ही  स्वाभिमानाची बाब असली तरी या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न६३ वर्षानंतरही मात्र जैसे थे आहेत, या संस्थे मार्फत सन १९२७ पासुन जल आणि विद्युत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात येतात, या धरणातील पाण्याचे जलविद्युत निर्मितीसाठी 2002  आणि 2015 मध्ये लेक टॅपिंग करण्यात आले, देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील हा पहिलाच प्रयोग होता, कोयना धरणातील पाण्याचा वापर करून पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील विद्युत निर्मिती केंद्राद्वारे ऊर्जानिर्मिती करण्यात येते, त्यासाठी बोगद्याद्वारे पाणी जलविद्युत केंद्रात आणले जाते त्यानंतर बाहेर पडणारे पाणी कोळकेवाडी धरणात साठवले जाते, त्यानंतर कोळकेवाडी धरणातील पाणी तिसऱ्या टप्प्यातील जलविद्युत केंद्रात ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येते त्यानंतर हे पाणी वसिष्ठी नदी द्वारे अरबी समुद्राला जाऊन मिळते त्याचे व्यवस्थापन उत्कृष्टपणे केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या धरणातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी आणि सिंचनासाठी वापरण्यात येत आहे जलविद्युत प्रकल्पची स्थापित विद्युत निर्मिती क्षमता 1960 मेगावॅट आहे या धरणातून होणाऱ्या ऊर्जानिर्मिती मुळे राज्यात औद्योगिक विकास होण्यात हातभार लागला आहे या धरणाची लांबी 807 मीटर असून उंची १०३  मीटर आहे,
धरणाची पाणी साठवण क्षमता 105 अब्ज घनफूट (टीएमसी) आहे या धरणामुळे 892 वर्ग किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले जलाशय निर्माण झाला आहे,
 या जलाशयास शिवसागर जलाशय म्हणून ओळखले जाते, या प्रकल्पास उत्कृष्ट व्यवस्थापनाचा पुरस्कार जाहीर झाला असला तरी सुरक्षेच्या बाबतीमध्ये नेहमीच व्यवस्थापनाकडून हलगर्जीपणा पहावयास मिळत आहे त्याचबरोबर शिवसागर जलाशय अंतरंगातील बोटिंग बंद केल्याने या परिसरातील पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या कोयना धरण पर्यटनास बकाल स्वरुप आलेले आहे, त्याच बरोबर या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या त्या प्रकल्पग्रस्तांचे ६३ वर्षानंतरही त्यांचे पुनर्वसनाचे प्रश्न काही सुटले नाहीत, राष्ट्राच्या हितासाठी आपले सर्वस्व बहाल करणाऱ्या कोयना प्रकल्पग्रस्त मात्र देशोधडीला लागला, दोन चार पिढ्या गेल्या तरी हे कोयना प्रकल्पग्रस्त आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत आहेत हे दुर्दैव,
Attachments area

No comments:

Post a Comment