पाटणमध्ये 55 बंदूकांचा शस्त्रसाठा जप्त - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, January 17, 2019

पाटणमध्ये 55 बंदूकांचा शस्त्रसाठा जप्त





सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण: येथील मोरे गल्लीत छापा मारून पाटण पोलिसांनी विनापरवाना साठा केलेल्या 55 सिंगल आणि डबल बोअरच्या बंदूकांचा शस्त्रसाठा जप्त केला. पोलीस उपअधीक्षक अंगद जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या शस्त्रसाठा जप्तीच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रकाश शंकर यादव (रा. पाटण) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटण येथे प्रकाश शंकर यादव यांचा परवाना असलेले बंदूक विक्री दुरुस्तीचे दुकान आहे. उपअधीक्षक जाधवर यांनी  दुकानाला भेट देऊन पाहणी केली असता. यादवने मोरे गल्लीतील आपल्या घरात अनधिकृतपणे शस्त्रसाठा करून ठेवल्याचे उघड झाले. त्याच्याकडून 55 सिंगल आणि पडबिंल बोअरच्या बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. अनधिकृत शस्त्रसाठाप्रकरणी 6 महिने कैद व 2 हजार रुपयांची शिक्षा होऊ शकते. त्यानुसार 30 आर्म अ‍ॅक्टनुसार पोलिसांनी कारवाई केली असून या कारवाईत जाधवर यांच्यासमवेत पाटणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भापकर, स्वामी, सहाय्यक फौजदार भरते, पी. एन. निगडे, पोलीस कॉन्स्टेबल भगले यांनी भाग घेतला. 

No comments:

Post a Comment