एसटीबसच्या अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, January 22, 2019

एसटीबसच्या अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

पाटण : एसटीबसच्या पुढील चाकाखाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी  घटना आज सकाळी सातच्या सुमारास ढेबेवाडी-कराड मार्गावरील गुढे ता.पाटण गावाजवळ घड़ली. समृध्दी भरत कदम वय-१५ रा.गुढे,ता.पाटण असे मृत मुलीचे नाव असून सकाळी तळमावले ता.पाटण येथे शाळेत जाताना हा अपघात झाला.


याबाबत घटनास्थळी ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहिती अशी, समृध्दी तळमावले येथील श्री वाल्मिकी विद्यामंदीरात दहावीच्या वर्गात शिकते. आज सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी मैत्रिणींसोबत गावाजवळच्या बसथांब्याजवळ आली होती. त्यावेळी ढेबेवाडीकडून कराडकडे निघालेली कराड आगाराची बस पकडताना (क्रमांक एमएच१४ बीटी ३६६५) ती बसच्या पुढील चाकाखाली सापडून चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी ग्रामस्थ व नातेवाईंकांची गर्दी झाली होती. येथील पोलिसांना याबद्द्ल समजताच सहाय्यक पोलिस निरिक्षक उत्तम भजनावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसच्या चालक व वाहकांनी घटनास्थळावरून पोलिस ठाण्यात धाव घेतली.  या घटनेची माहिती दिली. समृध्दी अत्यंत हुशार विद्यार्थीनी होती. विद्यालयातील विविध उपक्रमांतून तिचा सहभाग असायचा.तिच्या अपघाती निधनाचे वृत समजताच विद्यालयासह गुढे परिसरावर शोककळा पसरली आहे. 

No comments:

Post a Comment