निमसोडच्या उपसरपंचपदी संगीता घार्गे - देशमुख यांची बिनविरोध निवड - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, January 15, 2019

निमसोडच्या उपसरपंचपदी संगीता घार्गे - देशमुख यांची बिनविरोध निवड


निमसोड ता.खटावच्या नवनिर्वाचित उपसरपंच संगीता घार्गे-देशमुख यांचा सत्कार करताना सरपंच धनश्री देशमख, रणजित देशमुख व मान्यवर 
निमसोड 
येथील उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये संगीता घार्गे - देशमुख यांची बिनविरोध निवड झाली.
येथील माजी उपसरपंच संतोष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते . या रिक्त पदासाठी  आज मंगळवारी निवडणुक निर्णय अधिकारी संजय कोठावळे यांच्या  अध्यक्षतेखाली  ग्रामसेवक तुकाराम खाडे ,राजनाथ शिंदे उपस्थित ही निवडणुक पार पडली.विरोधी गटाकडुन एकही  अर्ज नआल्याने उपसरपंच पदावर संगीता घार्गे - देशमुख यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी हरणाई सुतगिरणीचे संस्थांपक अध्यक्ष रणजित देशमुख,सरपंच धनश्री देशमुख, माजी सरपंच शिवाजी देशमुख ,अँड.सुभाष देशमुख,  सोसायटी चेअरमन भिमराव घाडगे , अभिजीत देशमुख मोहन देशमुख , नामदेव घाडगे ,महादेव माने,बाळासाहेब घाडगे, माजी उपसरपंच संतोष देशमुख, चंद्रकांत घाडगे ,बाळासाहेब घाडगे , संजय शितोळे , किसन कदम , महादेव तांमखडे , हुमाइन तांबोळी ,युवराज घार्गे,  भिकु घाडगे , विनायक देशमुख ,रामदास चौधरी ,धनाजी देशमुख विरोधी पक्षाच्या सदस्य उषा घाडगे , रमेश घाडगे सह सत्ताधारी गटाचे सर्व ग्रामपंचायत सदस्य  उपस्थित  होते.

राजकारण केले नाही व जाणार नाही

गेल्या तीन वर्षापासून निमसोड गावाचा सर्वांगीण विकासाचे काम सदस्याच्या प्रयत्नातुन सुरु आहे. गावच्या विकास कामामध्ये कधीही राजकारण केले नाही व जाणार नाही सरपंच ,उपसरपंच व सर्व सदस्यांनी  कोणतेही हेवेदावे नकरता हातात हात घालुन काम करावे --रणजित देशमुख संस्थापक हरणाई सुतगिरणी येळीव ता.खटाव


No comments:

Post a Comment