महाविद्यालयीन युवतीच्या निर्घृण हत्येने ढेबेवाडी परिसरात खळबळ - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, January 22, 2019

महाविद्यालयीन युवतीच्या निर्घृण हत्येने ढेबेवाडी परिसरात खळबळ


पाटण :- पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील  करपेवाडीच्या हद्दीत एका ऊसाच्या शेतात सतरा वर्षीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवतीचा धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या झाली असून या घटनेने ढेबेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.


 याबाबत ढेबेवाडी पोलीस व घटना स्थळावर मिळालेल्या माहिती नुसार ,करपेवाडी येथील कु. भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने, वय 17 ही तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालय इयत्ता 12 वीच्या कला  शाखेत शिकत असून त्याचबरोबर  तळमावले येथील एका खाजगी रुग्णालयात काम करत होती. दरम्यान तीने नुकतीच 12 वीची परीक्षा जवळ आल्यामुळे कामावरून सुट्टी घेतली  होती. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ती कॉलेजला निघून गेली होती. दुपार पर्यंत घरी का आली नाही म्हणून आई व आजी व घरच्या लोकांनी शोध घ्यायला सुरवात केली असता करपेवाडीतून तळमावले जाणाऱ्या पाणंद रस्त्यावरील देसाई शेत शिवारामध्ये  रक्ताच्या थारोळ्यात  आढळून आली यानंतर आई व आजीने हबरठा फोडला झालेली घटना कळताच तळमावले, करपेवाडी परिसरातील लोकांनी घटनास्थळी  धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे स.पो.नि उत्तमराव भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास त्याच्या मार्गदर्शनखाली ढेबेवाडी पोलीस करत आहेत. या घटनेची फिर्याद मुलीचे वडील संतोष माने यांनी ढेबेवाडी पोलिसात दिली आहे.


No comments:

Post a Comment