झाडे लावुन कुरनेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपने आगळ्या वेगळ्या पद्धतीने नव्या वर्षाची सुरवात - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, January 1, 2019

झाडे लावुन कुरनेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपने आगळ्या वेगळ्या पद्धतीने नव्या वर्षाची सुरवात

वृक्षारोपण करताना सौ. व श्री.पी.कुलकर्णी,सोबत मान्यवर  व ग्रुपचे सदस्य.(छाया:अनिल वीर)


बाकड्याचे अनावरण करताना सी.देशपांडे व मान्यवर.(छाया:सार्थक खंडूझोडे)


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

सातारा : पर्यावरनाचा कायमच ध्यास घेणारी कुरनेश्वर वॉक मॉर्निंग ग्रुपने नव्या वर्षाची सुरवात अनोख्या पद्ध्तीने करून समाजापुढे आगळा वेगळा असा आदर्श ठेवला आहे.पूर्वसंध्येला बागेत बाकडा व परिसरात वृक्ष लागवड करून कोणत्याही प्रकारचे व्यसन न करण्याचा संकल्प जाहीर केला आहे अध्यक्षस्थानी डॉ.सतीश भोसले होते.


बोगदा ते स्व.अभयसिहराजे भोसले पथ परिसरात  कुरनेश्वर मॉर्निंग ग्रुपच्यावतीने वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणांत करण्यात आली. प्रारंभी सी.पी.भोसले यांच्या हस्ते बागेतील बाकड्याचे उदघाटन करण्यात आले.तदनंतर मान्यवरांच्या हस्ते विवीध प्रकारची झाडे लावण्यात आली.यावेळी पी.कुलकर्णी क्लासेस संचालक प्रशांत कुलकर्णी,सौ.शुभांगी कुलकर्णी,अनिरुद्ध वीर,अशोक यादव,विजयकुमार भद्रे,शंकर सकट,अभय देशमुख,सार्थक खंडूझोडे, ऍड.सपकाळ,दीपक दीक्षित,राबिन कदम,शिवाजी क्षीरसागर, डॉ.सतीश भोसले,अनिल वीर आदी विविध स्तरातील मान्यवर,सदस्य उपस्थित होते.


पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलेे पाहिजे.ग्रुपच्या कार्यशैलीचाही आढावा अध्यक्षस्थानावावरून बोलताना डॉ.सतीश भोसले यांनी घेतला. सुमारे  ८ वर्षे झाली परिसराचा कायापालट ग्रुपच्यावतीने करण्यात आला आहे.आतापर्यंत पाण्याच्या टाक्या,स्वच्छता, वाढदिवसानिमित्त झाडे लावण्याचा उपक्रम,नियमित पाणी झाडांना घालणे व स्वच्छता राखणे.व्यसनापासून युवकांना दुर राहण्याचा सल्ला देणे.मॉर्निंग वॉकचे फायदे आदी विषयावर सकारात्मक चर्चा-विनिमय निरंतर करण्यात येत असतो. राहुल गोळे यांनी स्वागत केले.उमेश खंडूझोडे यांनी प्रास्ताविक व  आभारप्रदर्शन केले.



 


No comments:

Post a Comment