राज्यातील जनता परिवर्तनाच्या तयारीत : श्रीमंत संजीवराजे - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, January 28, 2019

राज्यातील जनता परिवर्तनाच्या तयारीत : श्रीमंत संजीवराजे



विक्रम चोरमले/फलटण:-  सध्या देशात व राज्यात असण्यार्‍या फसव्या मोदी  सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात निर्धार परिवर्तनाचा म्हणुन सभा आयोजित करित आहेत. त्या सभेला संपुर्ण राज्यातुन जो प्रतिसाद मिळत आहे हे पाहता आता जनातही या सरकारकारला कंटाळली आहे. राज्यातील जनता आता परिवर्तनाच्या तयारित आहे. दिनांक 29 जानेवारी 2019 रोजी फलटण येथे होणार्‍या सभेस  मो ठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे  आ वाहन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निर्धार परिवर्तनाच्या सभेच्या आढावा बैठकीप्रसंगी केले. 


यावेळी आमदार दीपक चव्हाण, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, नगराध्यक्षा सौ. निता नेवसे, सभापती सौ.प्रतिभा धुमाळ, उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर-निंबाळकर, सदस्य श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर, सुभाष नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रात व राज्यात परिवर्तन घडविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेत जागृती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर सुरु असलेली निर्धार परिवर्तन यात्रा मंगळवार, दिनांक 29 रोजी फलटण येथे येत असून यावेळी शहरातील मुधोजी कल्ब ग्राउंडवर सायंकाळी 5 वाजता राष्ट्रवादीची जाहीर सभा होणार आहे. यानिमित्ताने माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. या परिवर्तन यात्रेचे दिनांक 29 रोजी कोल्हापूरहून सातारा जिल्ह्यात कर्‍हाड येथे आगमन होणार आहे. यादिवशी रहिमतपूर आणि फलटण येथे जाहीर सभा होणार आहे. सदर दिवशी यात्रेचा मुक्काम फलटण येथे होणार असून दिनांक 30 रोजी ही यात्रा पंढरपूरकडे रवाना होणार आहे. 


निर्धार परिवर्तन सभेला उच्चांकी गर्दी करण्याचे आवाहन

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात या परिवर्तन यात्रेनिमित्ताने राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन करायचे आहे. संपुर्ण राज्याला फलटण येथील शक्तिप्रदर्शन आपल्याला दाखवून द्यायचे आहे. माढा मतदारसंघातील फलटण येथे होणार्‍या या सभेची जबाबदारी नगपरिषदेच्या नगराध्यक्षा, शहरातील सर्व नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी.


श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात सत्ता गेलेल्याची जरी जाणिव झाली नसली तरी आपल्याला निधी मिळताना किती दुजाभाव होतो हे वेगळे सांगण्याची काही गरज नाही. केंद्रात व राज्यात आपले सरकार असताना आपल्याला जसा भरिव निधी मिळत होता, तसा निधी आता मिळत नाही. खासदार शरद पवार केंद्रात असताना बर्‍याच नाविण्यपुर्ण योजना आपल्याकडे येत होत्या. फलटणची सभेची चर्चा ही फक्त आपल्या जिल्ह्यापुर्ती राहत नाही तर सोलापुर व पुणे जिल्ह्यातही होते. असेही श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले. आजच्या नियोजन सभेला तालुक्यातील काही पदाधिकारी उपस्थित राहिले नाहीत. याबाबत खंतही आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.


राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असलेला व खासदार शरद पवार यांच्या विचाराने पुढे जाणारा आपला सातारा जिल्हा आहे. अश्या रॅली व सभांमधुन पवार साहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहचण्याचे प्रभावीपणे काम होत असते. तरी या सभेला माण व खटाव तालुक्यातुन बहुसंख्य उपस्थिती दर्शवण्यासाठी आपण प्रयत्न करु असे आश्‍वासन निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी दिले. यावेळी आरोग्य समितीचे सभापती अजय माळवे, शिक्षण सभापती आसिफ मेटकरी, महिला व बालकल्याणच्या सभापती सौ.सुवर्णा खानविलकर, नगरसेवक अभिजीत भोसले, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, राहुल निंबाळकर, फिरोज बागवान आदींची उपस्थितीही होती. बाळासाहेब सोळस्कर, भिमदेव भुरंगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे शहराध्यक्ष मिलींद नेवसे यांन केले. आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे युवक अध्यक्ष जयकुमार इंगळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment