अंबवडे येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसुलची धाड, तहसीलदार व भरारी पथकाची सहा वाहनांवर कारवाई - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, January 22, 2019

अंबवडे येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसुलची धाड, तहसीलदार व भरारी पथकाची सहा वाहनांवर कारवाई

वाळू माफियांनी चक्क पिकअप वाहनातून वाळू वाहतूक सुरू केली आहे


येरळवाडी:-  अंबवडे ता खटाव  हद्दीत येरळा नदीत अवैध वाळु उपसा सुरू असल्याची खबर महसुल विभागाला मिळताच उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे  यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जयश्री आव्हाड व भरारी पथकाने सापळा लावुन अवैध वाळू वाहतूक करणारी एकूण सात वाहने पकडली.यामध्ये प्रामुख्याने ३ ट्रेकटर व ३ पिकअप वाहने असल्याची माहिती कळते. 


 या कारवाईत  प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जयश्री आव्हाड , उपविभागीय अधिकारी भरारी पथक प्रमुख गणेश बोबडे , दहिवडी तहसिल कार्यालय लिपिक अंकुश जाधव , रवी शिंदे तलाठी हिमंत बाबर , गणेश पिसे , अक्षय साळुंखे , प्रविण कांबळे , आर .डी .शिंदे आदी सहभागी झाले होते. खटाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी  उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी कारवाई करून वाळू माफियांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र महसूल विभागाकडून ही आता मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची सुरुवात झाल्याचे या निमित्ताने दिसून येते. गेल्या काही महिन्यांपासून भरारी पथकाच्या कारवाई थांबल्या होत्या. तर आज झालेल्या कारवाईत भरारी पथकाचा ही सहभाग होता. महसूल विभागाने केलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या  वाहनांवर कारवाई करून वाळु तस्करांना चांगलाच चाप दिला असला तरी ही कारवाई अशीच सुरू राहावी अशी मागणी केली जात आहे.


पाठलाग करून पकडली वाहने

आज तहसीलदार जयश्री आव्हाड व प्रांत कार्यलयाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ही वाहने पाठलाग करून पकडण्यात आली. यामुळे या धडाकेबाज कारवाईची चर्चा मात्र सर्वत्र होत होती.



No comments:

Post a Comment