माढा लोकसभेचा निकाल जाहीर होताच वाठार स्टेशन येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, May 24, 2019

माढा लोकसभेचा निकाल जाहीर होताच वाठार स्टेशन येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

 विजयी मिरवणुकीत जल्लोष साजरा करताना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
                 ( छाया : - विजय दोरके )

वाठार स्टेशन 
 वाठार स्टेशन, विखळे, जाधववाडी,  फडतरवाडी ,तळीये येथील भाजपा,शिवसेना, रासप,आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी माढा लोकसभेची जागा मा.श्री.रणजीत दादा निंबाळकर यांनी भरघोस मतांनी जिंकल्यानंतर जोरजोरात घोषणा देत गुलाल उधळून तसेच फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. सविस्तर माहिती अशी राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या माढा लोकसभा  मतदारसंघातून नुकतेच भाजपवाशी झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा झेंडा फडकवला.माढा लोकसभेच्या निकालाची उत्कंठा गेल्या महिन्यापासून महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना होती. 23 मे 2019 ला निकालाचे आकडे स्पष्ट होताच आज दुपारीच सर्व कार्यकर्ते एकत्र आले जसजसे रणजीत दादा आघाडीवर होते तसे तसे कार्यकर्त्यांना आपला उमेदवार निश्चित विजय होणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी गुलालाची पोती फटाक्याची तयारी करून ठेवली होती.तसेच मिरवणूक काढण्यासाठी वाजंत्री आणले होते  मग काय ? फटाक्याची आतषबाजी करत गुलाल उधळून घोषणा देत विजयी मिरवणूक वाठार स्टेशन मधून वाजत-गाजत काढण्यात आली. वाठार स्टेशन मधील सर्व कार्यकर्ते मोठ्या आनंदाने व उत्साहाने वाजंत्रीच्या तालावर नाचून आपला आनंद व्यक्त करत होते 'कोण म्हणत येणार नाही आल्याशिवाय राहणार राहणार नाही'अशा घोषणा देत'विजयी मिरवणूक पुढे एसटी स्टँड वरून वाठार गावाकडे गेली. तसेच कार्यकर्त्यांनी पेढे,लाडू, जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला, मिरवणूक वाठार गावात फिरून झाल्यानंतर त्याची सांगता महादेव मंदिराजवळ करण्यात आली. विजयी मिरवणूकीत शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री अमोल आवळे,रासपाचे भाऊसाहेब वाघ, भाजपा जिल्हा चिटणीस मनोज कलापट,बाळासाहेब लोंढे,सदाशिव गायकवाड,यशवंत पवार,राजेश काळोखे, इरफान पठाण,आरपीआयचे हेमंत दोरके, खुशाल वाघ,मंगेश शितोळे, ज्ञानेश्वर लोंढे,सुभाष बुरुंगले, अशोक पवार तसेच बहुसंख्येने व्यापारी,ग्रामस्थ व महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment