सावरकर भक्त मेळाव्यात होणार मान्यवरांचा सन्मान - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, May 24, 2019

सावरकर भक्त मेळाव्यात होणार मान्यवरांचा सन्मान



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
........................................
सातारा :  अखिल भारत हिंदू महासभा सातारा जिल्ह्याच्यावतीने मंगळवार दिनांक 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर भक्त मेळावा आयोजित करण्यात आलेला असून या मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना स्वा.सावरकर यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
‘शिवम सभागृह’ कोटेश्वर मंदिरामागे, सातारा हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याचे अध्यक्षपद महामंडलेश्वर 1008 श्री श्री रघुनाथजी महाराज तथा देवबाप्पा (फरशीवाले बाबा), माऊलीधाम, त्र्यंबकेश्वर हे भूषविणार असून विविध स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण त्यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. गोविंद गांधी, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश हिंदू महासभा उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समाजभूषण पुरस्कार’ सातारा येथे समाजसेवेत अग्रेसर असलेल्या व ज्ञानविकास मंडळ, सातारा यांचेवतीने गेली 60 वर्षे ज्ञानयज्ञ चालविणारे  वि. ल. चाफेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर उद्योगभूषण’ पुरस्कार उद्योग क्षेत्रात आपल्या स्वकष्टाने भरारी घेणार्‍या व समाजसेवेची तळमळ असणार्‍या वसंतशेठ जोशी यांना तसेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सहकारभूषण’ पुरस्कार माण व खटाव या दुष्काळी भागात नंदनवन करण्याचा प्रयत्न करणारे रणजितसिंह देशमुख यांना, तसेच कला क्षेत्रात जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर अग्रेसर असलेले  निवास कांबळे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर कलाभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘हिंदुभूषण वासुदेवराव रेडकर’ पुरस्कार गोवा स्वातंत्र्यसैनिक श्री.केशवराव साठे यांना देण्यात येणार आहे.
अनेक वर्षांनंतर महामंडलेश्वर डॉ.श्री श्री 1008 रघुनाथजी महाराज देवबाप्पा तथा फरशीवाले बाबा यांचे आगमन सातार्‍यात होणार असून त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अ‍ॅड. दत्ता सणस, जिल्हाध्यक्ष हिंदू महासभा यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनराज जगताप,अ‍ॅड.सतीशराव खानविलकर,  कुंभार महाराज, उमेश गांधी, ललित ओसवाल, बंटीराज जगताप, भंवरलाल जैन, अरविंदराव बर्गे, विजयराव बर्गे, श्री.मंगलसिंग राजपुरोहित, राजूसिंग राठोड, प्रवीण बाबर, रमेश बर्गे, रमेश ओसवाल, शंतनू पवार इ. प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment