हृदयविकाराच्या धक्क्याने पोलिसाचे निधन - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, May 24, 2019

हृदयविकाराच्या धक्क्याने पोलिसाचे निधन

 
सातारा : पोलीस कॅन्टीनमध्ये ड्यूटीवर असताना हृदयविकाराचा झटका येऊन गणेश गुरव (वय ३५, रा. वडूथ, ता. सातारा) या पोलीस कर्मचाºयाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
गणेश गुरव हे गेल्या अडीच वर्षांपूर्वी जिल्हा पोलीस दलात भरती झाले होते. यापूर्वी ते सैन्य दलात होते. पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुख्यालय शेजारी असणाºया पोलीस कॅन्टीनमध्ये लिपिक  म्हणून काम करत होते. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे ड्यूटीवर आले. यावेळी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना त्यांच्या सहकार्याने दुचाकीवरून खासगी दवाखान्यात नेले. दुचाकीवरून उतरल्यानंतर ते चालत रुग्णालयातही गेले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचे निधन झाले. गणेश गुरव यांचे निधन झाल्याचे समजताच अनेक पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. गुरव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment