Ticker

6/recent/ticker-posts

उद्योजक विजय (बापू) यादव यांचे निधन

वेळे वार्ताहर दिनांक 13

वेळे, तालुका वाई येथील हॉटेल आराम रिजेन्सी चे मालक विजय यादव उर्फ बापू (वय ७०) यांचे पुणे येथे उपचार घेत असताना दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण वेळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला आज सारे जण मुकले आहेत. त्यांनी अतिशय कष्टाने व जिद्दीने आपला हॉटेल व्यवसाय पुढे नेला व आज रोजी एका नामांकित उद्योजकांमध्ये त्यांचे नाव अग्रेसर राहिले. त्यांचे सामाजिक योगदान देखील वाखाणण्याजोगे होते. त्यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली, प्रोत्साहन दिले. अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेतला. विविध योजना व उपक्रम राबवून त्यांनी समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले. ' हाकेला धावून जाणारा माणूस ' अशीच त्यांची ख्याती होती. 

अतिशय कष्टाने व जिद्दीने उभारलेल्या व्यवसायाचे ते प्रमुख होते. त्यांचे व्यवसायावर जेवढे प्रेम होते तेवढेच प्रेम सामाजिक योगदानात देखील होते. त्यांनी फक्त व्यवसाय नाही तर लोकांना आपलेसे केले. म्हणूनच त्यांच्यावर प्रेम करणारे लोक बरेच आहेत. 

त्यांना कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासले होते. याच आजारातून ते कसेबसे सावरत असतानाच त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. म्हणून त्यांना पुणे येथील नामांकित दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली, आणि सर्वांना पोरके केले.

त्यांच्या आकस्मिक निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. त्यांचे पश्चात दोन भाऊ, पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

1 Comments