Ticker

6/recent/ticker-posts

बोरगाव सरपंचांचा कोरोनाने घेतला बळी

वेळे वार्ताहर दिनांक 25
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जोर खोर्यातील बोरगाव ता. वाई येथील ग्रामपंचातयती वर नुकतेच सरपंच या पदावर विराजमान झालेले सहदेव दगडु वाडकर वय ६० वर्ष यांचा कोरोनो मुळे मृत्यू झाल्याने वाईच्या पश्चिम भागा सह बोरगावावर शोककळा पसरली आहे 
सविस्तर वृत्त असे कि वाई तालुक्याच्या पश्चिम 
भागातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या बोरगावात आठवड्या पुर्वी कोरोनो रोगाची आलेल्या दुसर्या लाटेत अंदाजे १२ ते १३ ग्रामस्थांना कोरोनोची लागण झाली होती या नागरिकांना वेळेत औषधे ऊपचार मिळावेत या साठी सरपंच सहदेव वाडकर ऊर्फ अण्णा यांची 
धडपड सुरू असतानाच कोरोनो रोगाने थेट वाडकर यांच्या वरच हल्ला चढवल्याने वाडकर 
हे बांधीत निघाले त्यांना उपचारा साठी सातारा 
येथील रुग्णालयात दाखल केले होते पण नियतीने आणी काळाने त्यांच्या वर झडप घातल्याने शनिवार दि.२४ रोजी त्यांची प्राणजोत मालवली त्या मुळे बोरगावा सह वाई 
तालुक्याच्या पश्चिम भागावर शोककळा पसरली आहे 
सहदेव वाडकर हे अण्णा नावाने बोरगाव मध्ये परिचीत होते ते राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे कट्टर आणी निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते संपूर्ण वाई तालुक्यात परिचीत होते ग्रामपंचायत लागलेल्या निवडणूकीत सहदेव वाडकर यांच्या 
वार्डांत झालेल्या अतीतटीच्या निवडणूकीत ते 
भरघोस मतांनी निवडून आल्याने गावाने त्यांना 
सरपंच हे पद बहाल केले होते वाडकर हे जिव्हाळा आपुलकी जपणारे कधीही कुठेही केव्हाही सर्व सामान्यांच्या हाकेला धावुन जाणारे आणी येणारे असे त्यांचे व्यक्ती महत्व 
होते सरपंच वाडकर हे वारकरी पंथाचे नसताना देखील त्यांच्या मनात वारकर्यान बद्दल असलेली श्रध्दा प्रेम आपुलकी असा त्यांचा नावलौकिक होता पण गेल्याच आठवड्यात 
गावात १२ते १३ कोरोनो बाधीत निघालेल्या ग्रामस्थांची योग्य काळजी घेण्या साठी त्यांनी मोठी धडपड करीत त्यांना औषधे ऊपचार बेड व्यवस्था करण्या साठी ते खुप धावपळ करीत 
असतानाच कोरोनो रोगाने सरपंच सहदेव वाडकर अण्णा यांच्या वरच अॅटेक केल्याने ते बांधीत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत होती त्यांना ऊपचारा साठी सातारा येथील रुग्णालयात दाखल केले असतानाच काळाने झडप घातल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने बोरगावासह वाईच्या पश्चिम भागावर शोककळा पसरली आहे अण्णांच्या या अकाली निधनामुळे बोरगावात निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही असे तेथील कार्यकर्त्यांन सह नागरीकांन मधुन बोलले जात 
आहे.

Post a Comment

1 Comments

  1. धडाडीचा कार्यकर्ता, तळागाळातील लोकांपर्यंत सहज पोहोचणारा. समोरच्या लाख जरब बसवणारा पण साधी राहणी उच्च विचारसरणी असणारे उमदे व्यक्तीमत्व म्हणजे सहदेव वाडकर ऊर्फ खन्ना.

    ReplyDelete