सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर... येथे पर्यटनासाठी आलेल्या २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तुकाराम ओंबळे यांच्या नातेवाईकांना वेण्णा लेक येथील घोडेवाल्यांनी मारहाण केल्याची घटना काल वेण्णा लेक येथे घडली आहे.
गुरूवारी सायंकाळी ओंबळे कुटुंबातील सदस्य महाबळेश्वर येथे नौका विहार व घोडेस्वारी करण्यासाठी वेण्णा लेक येथे आले असता त्यांच्यातील एका महिलेला पाठिमागून धक्का दिल्याच्या कारणावरून ओंबळे कुटुंबीयांचा व स्थानिक घोडेवाल्यांचा वाद झाला त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले व तेथील घोडेवाल्यांनी ओंबळ कुटुंबातील रामचंद्र ओंबळे,ओबेश ओंबळे,सरोज ओंबळे, प्रथमेश ओंबळे यांना लाथाबुक्क्यांनी तसेच घोडे हाकण्यासाठी वापरत असलेल्या चाबकाने मारहाण केली त्या मध्ये चौघेजण जखमी झाले.
त्या नंतर ओंबळे कुटुंबातील स्वाती रामचंद्र ओंबळे रा..मुंबई सध्या केडंबे ता.जावली यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी जावेद खारकंडे व जुबेर वारुणकर या दोन घोडेवाल्यांना महिलेच्या तक्रारीवरून भा.द.वि.३५४,१४३,५०४,१४७,व ५०६ कलमानुसार गुन्हा नोंद करुन अटक केली आहे.दरम्यान शिवसेना पदाधिकारी एकनाथ ओंबळे यांच्या नातेवाईकांना मारहाण झाल्याची खबर समजताच
पोलिस ठाण्या बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश कुंभारदरे,शहर प्रमुख राजाभाऊ गुजर यांनी शिवसैनिकांना शांत करण्याची भूमिका बजावली.
अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलिस करीत आहेत.
1 Comments
Ghodewale far dadagiri kartat
ReplyDelete