क्षेत्र महाबळेश्वरच्या नियोजित विकास आराखड्यावर विशेष ग्रामसभा, गावठाणाचा प्रश्न प्रथम मार्गी लावावा ग्रामस्थांचा निर्धार - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, September 24, 2024

क्षेत्र महाबळेश्वरच्या नियोजित विकास आराखड्यावर विशेष ग्रामसभा, गावठाणाचा प्रश्न प्रथम मार्गी लावावा ग्रामस्थांचा निर्धार


फोटो ओळ- विशेष ग्रामसभेसाठी उपस्थित असलेले ग्रामस्थ व महिला.
 शेखर कदम
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
क्षेत्र महाबळेश्वर
महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असलेल्या क्षेत्र महाबळेश्वर येथील नियोजित विकास आराखड्यावर २३ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.याबाबत सविस्तर वृत्त असे की क्षेत्र महाबळेश्वरच्या १७७ कोटी रूपयांचा प्रारूप नियोजित विकास आराखडयाला मंजूरी मिळाली आहे मात्र या होणार्या विकास आराखड्याला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे .क्षेत्र महाबळेश्वर येथे दि २३ सप्टेंबर रोजी विकास आराखडा व गावठाणाच्या प्रश्नावर विशेष ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत गावातील ग्रामस्थांनी आप आपली मते व्यक्त केली.यामध्ये विकास आराखडा हा होत राहिल मात्र वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला गावठाणाचा प्रश्न प्रथम मार्गी लावण्यात यावा अशी आग्रही मागणी यावेळी ग्रामस्थांनमार्फत करण्यात आली.या ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील बिरामणे, सदस्य , ग्रामसेवक रणपिसे, व गावातील सर्व ग्रामस्थ,महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
--

No comments:

Post a Comment